राजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

पंचायत समितीच्या इमारतीसाठी हवा तेवढा प्रस्ताव द्या; मंत्री अब्दुल सत्तार

▪️सालईवाडा येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेची केली पाहणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०१: पंचायत समितीच्या इमारतीसाठी जेवढा आवश्यक असेल, तेवढा निधी आपण द्यायला तयार आहे. मात्र, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून द्यावा. अशा सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पंचायत समितीच्या इमारत जागेच्या पाहणी प्रसंगी बोलताना दिल्या.

यावेळी पंचायत समितीचे अधिकारी मनोज कल्याणकर यांच्याकडून त्यांनी तांत्रिक माहिती घेतली व इमारतीचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना केल्या. सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचे काम जागेअभावी रखडले होते. पंचायत समिती इमारत भटवाडी येथे करावी की, सावंतवाडीच्या पूर्वीच्या ठिकाणी याबाबत मते मतांतरे होती. अखेर पंचायत समितीने जिल्हा परिषद गोडाऊन च्या ठिकाणी असलेल्या जागेवर पंचायत समितीची इमारत उभी करावी असे ठरविले व या वादावर पडदा पडला. आज या ठिकाणी भेट देऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जागेची  पाहणी केली. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शितल राऊळ, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!