जंगलात ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेणाऱ्या कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्याला उमेद फौंडेशनचा आर्थिक मदतीचा हात..
▪️पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी उमेदच्या वतीने निश्चित प्रयत्न करणार; जे.डी. पाटील
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.०१: आरोस-माऊलीवाडी येथील जंगलात ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेणाऱ्या कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थी चेतन कोरगावकर याला शैक्षणिक मदतीसाठी उमेद फौंडेशनने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. चेतन कोरगावकर याच्या निवासस्थानी जाऊन त्याला रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.
चेतनच्या संघर्षमय शैक्षणिक घडपड ची माहिती उमेद फाऊंडेशन ला मिळाली. हा मुलगा ‘कर्णबधिर असुनही जंगलात जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत असल्याचे उमेद संस्थेने प्रत्यक्ष जाऊन पाहीले होते. या घडपड करण्याची त्याची जिद्द पाहून उमेद फौंडेशनचने दखल घेत सावंतवाडी तालुक्याचे प्रमुख सहाय्यक शिक्षक जे. डी. पाटील, शिक्षिका स्वाती पाटील यांनी आरोस येथे चेतनच्या घरी जात त्याच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती घेतली. चेतन हा कर्णबधिर व मूकबधिर असून त्याची शिक्षण घेण्याची जिद्द ही कौतुकास्पद आहे. तो दररोज १६ किलोमीटरची पायपीट करत जंगलात नेटवर्क शोधून आपला दैनंदिन अभ्यास ऑनलाईन करतो. तो पुणे येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. त्याची घरची परिस्थिती हलाखीची असून शिक्षण घेण्यासाठी व महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी त्याने गवंडी काम व रंगकाम करून पैसे गोळा केले आहेत. उमेद फौंडेशनचे जे.डी. पाटील यांनी सांगितले की, चेतनला आर्थिक मदत प्राथमिक टप्प्यासाठी देण्यात आली आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी उमेदच्या वतीने निश्चितच प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी चेतनचे वडील झिलु कोरगावकर, आई आनंदी कोरगावकर उपस्थित होते.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

