क्राइममहाराष्ट्रसातारासामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार

*🟥श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार*

*🟥पाच वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल का केले नाहीत ?* – *उच्च न्यायालयाची गृह आणि पोलीस विभागाला नोटीस*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 तुळजापूर, दि.:१५जुलै*
श्री तुळजाभवानी देवस्थानात वर्ष 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक आणि 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण खात्याने चौकशी अहवालाद्वारे महाराष्ट्र शासनाला केली आहे. त्याला पाच वर्षे उलटली, तरी दोषींवर कोणीही कारवाई अद्यापही झालेली नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ‘पाच वर्षे झाली तरी ‘सीआयडी’च्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत ?’, ‘पाच वर्षे गुन्हे दाखल करण्यासाठी पुरेशी नाहीत का ?’, असे प्रश्न महाराष्ट्र शासनाला विचारले आहेत. या संदर्भात मा. न्यायालयाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य गृह सचिव, पोलीस महासंचालक, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, संभाजीनगर आणि पोलीस अधीक्षक, धाराशीव यांना 22 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणणे मांडण्याची नोटीस पाठवली आहे.
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी तथा अधिवक्ता उमेश भडगांवकर यांच्या मार्फत फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती देशपांडे यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. तसेच समितीच्या फौजदारी रिट याचिकेला जनहित याचिकेत रुपांतर करण्याची अनुमती दिली आहे. वर्ष 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने श्री तुळजापूर मंदिर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते; मात्र यात अनेक बडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी असल्याने चौकशी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे समितीने वर्ष 2015 मध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका (क्र. 96/2015) दाखल केली होती. त्यावर 20 सप्टेंबर 2017 या दिवशी अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांना चौकशी अहवाल सादर करण्यात आला; मात्र तो अहवाल विधीमंडळात सार्वजनिक न करता दडवून ठेवण्यात आला. या संदर्भात दुसरी याचिका दाखल केल्यावर संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती आर्.डी. धनुका आणि न्यायमूर्ती एस्.जी. मेहरे यांनी 22 एप्रिल 2022 या दिवशी सदर अहवालाची प्रत हिंदु जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला दिले.
या चौकशी अहवालात 16 शासकीय अधिकारी आणि लिलावधारक यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच त्या कालावधीत मंदिराचे विश्वस्त असणारे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विभागीय स्तरावर कारवाई करण्याची शिफासर केली होती; मात्र पाच वर्षे झाली, तरी यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अनेकदा निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही शासनाने काही कार्यवाही केली नाही. त्यामुळे समितीला तिसर्‍यांदा न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. त्यात वरील आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!