महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदाराच्या कंपनी पाठीशी
*🟥महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदाराच्या कंपनी पाठीशी*
*🟥ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट कामाकडे कानडोळा*मग टोल साठी घाई का?*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:१४ जुलै*
कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या तुलने सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरण कामाला गती मिळाली आणि बहुतांशी काम पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र अद्याप काही ठिकाणी सर्विस रोड गटार आणि काही ठिकाणी महामार्गावर कामे अर्धवट आहेत अनेक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही काही ठिकाणी काही भागात चुकीच्या पद्धतीने काम केल्याने पाण्याचा निचरा न होणे शेतीमध्ये पाणी घुसणे लगतचे रस्ते पाण्याखाली जाणे असे प्रकार झाले आहेत याप्रकरणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी अनेकवेळा उपोषणे देखील केली आहेत . मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणातील सिंधुदुर्ग काम बहुतांश पूर्ण केल्याचा दावा ठेकेदार कंपनीकडून केला जात असला तरी अद्यापही अनेक सर्विस रस्ते गटारे तर काही ठिकाणी महामार्गाचे कामे अपूर्ण आहेत शिवाय झालेल्या कामातही ठीक ठिकाणी निरकुष्टपणा उघड झाला आहे कणकवली बॅरिकेटला आढळून दोघांना आपला जीव गमावावा लागला आहे या साऱ्या प्रश्नाकडे ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण कानाडोळा करत असून टोल वसुलीसाठी मात्र यांचा आटापिटा सुरू आहे ठेकेदार कंपनीच्या अनेक त्रुटींकडे आणि अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष करून यांना पाठीशी घालण्याचे काम महामार्ग प्राधिकरण करत आहे. कणकवली
गडनदी नजीक वागदे येथील ५०० मीटरच्या लेनचे महामार्गावर काम अद्याप अपूर्ण आहे संबंधित जमीन मालकांना मोबदला न मिळाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे यामुळे एकाच लेन वरील वाहतुकीमुळे वेळोवेळी या ठिकाणी अपघात झाले आहे
वेताळवांबर्डे ब्रिज जवळ एका लेनचे काम अर्धवट आहे या ठिकाणी जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही त्यामुळे काम थांबले आहे . अनेक ठिकाणी सर्विस रस्त्याची कामे अर्धवट आहेत काही ठिकाणी सर्विस रस्त्यावर आतापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे लगतच्या गटारांची कामे निरकुष्ट आहेत यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहताना दिसत आहे तर उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूने प्लंबिंगचे काम अर्धवट ठेवल्याने उड्डाणपूरावरील पाण्याचे धबधबे सर्विस रोड वरून जाणाऱ्या पादऱ्यावर आणि वाहनांवर पडत आहेत. शंभर वर्षाहून अधिक काळ वाहतूक सुरू असलेला ब्रिटिशकालीन पूल अद्यापही भक्कम आहे मात्र या महामार्गावरील बांधलेल्या फुलाचा भराव कचल्याने कामातील निरकुष्टपणा उघड झाला आहे .महामार्गावर लेव्हल नाही अनेक ठिकाणी काही ना काही त्रुटी आहेतच स्थानिक नागरिकांकडून या दूर करण्याची मागणी बरेचवेळा करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही सारी परिस्थिती महामार्गाच्या कामांची असताना ओसरगाव येथे टोल वसुली सुरू करण्यासाठी हालचाली होत आहेत. जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत टोल वसुली करण्यास राजकीय पक्षांनी विरोध केला होता म्हणजे महामार्ग कामाच्या दर्जाबाबत आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे महामार्ग ठेकेदार कंपनीचे काहीच देणे घेणे नाही आता केवळ टोल वसुली हे त्यांचे टार्गेट आहे. आपल्याच जिल्ह्यातून महामार्गावरून प्रवास करताना आपल्याच जिल्ह्यातील लोकांना टोल द्यावा लागणार आहे मात्र जिल्हा वासियांना टोल माफी मिळाली पाहिजे की जनतेची मागणी आहे. टोलबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत प्रशासनाने ग्वाही दिली होती त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामावेळी आंदोलने करणारे या विविध प्रश्नाबाबत आक्रमक होणार का ? असा सावाल उपस्थित केला जात आहे. मात्र तरीही पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांना टोल माफी मिळण्याबाबत नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. नवे सरकार जिल्हा वासियांना दिलासा देणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*💐वाढदिवस अभिष्टचिंतन💐*
_🎂💐शिवसेना युवा नेते *मा.श्री.संदेश पारकर* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!_
*▪️शुभेच्छुक:-*
*मा.श्री. वैभव नाईक*
(कुडाळ मालवण मतदारसंघ,आमदार )
*मा.श्री. संजय पडते*
(शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग)
*मा.श्री. सतीश सावंत*
(माजी जिल्हा बँक अध्यक्ष)
*मा.श्री. सुशांत नाईक*
(जिल्हा बँक संचालक)
*मा.श्री. अँड. हर्षद गावडे*
( युवा सेना माजी जिल्हाप्रमुख)
तसेच तमाम सिंधुदुर्ग शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

