बांबू तोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या वहिनीला पुतणीला काठीने मारहाण करण्याबरोबरच चुलत काकांकडून शिवीगाळ
*🟥बांबू तोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या वहिनीला पुतणीला काठीने मारहाण करण्याबरोबरच चुलत काकांकडून शिवीगाळ*
*🟥मळगांव लातयेवाडी येथे सोमवारी घडलेल्या घटना व मारहाणी बाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.:१२जुलै*
आपल्या मालकीच्या जमिनीतील बांबू तोडल्याबाबत विचारणा करुन जाब विचारल्याच्या कारणावरून जाब विचारणाऱ्या वहिनीला व पुतणीला चुलत काकाने काठीने मारहाण करण्याबरोबरच शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार दि. 11 जुलै 2022 रोजी मळगांव लातयेवाडी येथे घडली. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या इसमास मळगांव ग्रामपंचायती मार्फत समज देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मळगांव लातयेवाडी येथे नामदेव दाजी लातये व वसंत बाबू लातये हे दोन चुलत भाऊ शेजारी शेजारी वास्तव्य करतात.याठिकाणी दोघांचीही स्वतंत्र घरे आहेत. या दोघांमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन वाद असून यावरून या दोघांमध्ये पुर्ववैमनस्य आहे. दरम्यान यातील वसंत लातये (वय वर्षे 70) यांनी या ठिकाणी असलेल्या नामदेव लातये यांच्या मालकीच्या बांबूच्या बेटीतील बांबू शनिवार दि. 9 जुलै 2022 रोजी तोडले होते. यासंदर्भात नामदेव लातये यांनी वसंत लातये यांना जाब विचारला असता वस़ंत लातये यांनी नामदेव लातये यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत नामदेव लातये यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदणी क्रमांक 272/2022 नोंदवला होता. तसेच त्यांनी मळगांव ग्रामपंचायत येथे लेखी पत्र लिहून दिले होते. त्यानुसार मळगांव ग्रामपंचायत सरपंच यांनी वसंत लातये यांना दिनांक सोमवारी 11 जुलै 2022 रोजी चौकशी साठी हजर राहण्याचे कळविले होते. त्यानुसार वसंत लातये हे दुपारी 1.00 वाजता ग्रामपंचायत येथे जाऊन घरी आल्या नंतर नामदेव लातये यांची पत्नी भाग्यश्री लातये ही येथील जास्वंदीची फुले काढण्यासाठी गेली असता त्यांना ते पुन्हा बांबूच्या बेटीतील बांबू तोडून घेऊन जाताना दिसले. यामुळे भाग्यश्री लातये यांनी वसंत लातये यांना उद्देशून, “अजून बांबू तोडायचे शिल्लक राहिले आहेत काय? असा प्रश्न केला. यामुळे वसंत लातये यांनी रागाने भाग्यश्री लातये यांना आपल्या हातातील दांड्यांने डोक्यावर व उजव्या खांद्यांवर मारुन दुखापत केली. यावेळी यातील तक्रार दार असलेली त्यांची मुलगी मृणाली नामदेव लातये, वय वर्ष 23 वर्ष ही आपली आई भाग्यश्री लातये हिला वाचवण्यासाठी पुढे गेली असता वसंत लातये यांनी तिच्या डोक्यावर आपल्या हातातील दांड्यांने मारले. यामुळे मृणाली हिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असल्याचे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले असून आपले चुलत काका वसंत लातये यांनी आपणांस शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याचे आपल्या जबानीत म्हटले आहे.
दरम्यान मृणाली हिला गंभीर दुखापत झाल्यामुळे व डोक्यातून रक्त वाहू लागल्याने तिचा काका वसंत लातये हे तिथून निघून गेले.यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले व सर्व भांडण तसेच मारहाण प्रत्यक्ष पाहिलेल्या स्वप्नील सुभाष गावडे तसेच लक्ष्मी कृष्णा लातये, कृष्णा गोविंद लातये यांनी हे भांडण सोडविण्यासाठी धाव घेतली व भांडण सोडविले. तर स्वप्नील गावडे यांनी जखमी मृणाली हिला आपल्या दुचाकीवरुन त्वरीत सावंतवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेऊन तातडीने उपचार करुन घेतले.
यानंतर मृणाली हिने त्यांच्या सोबतच सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दि. 11 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7.00 वाजता अदखलपात्र गुन्हा नोंदणी क्रमांक 0109 अंतर्गत भा, द. वि. दंड संहिता 1860 नुसार कलम 324,323,504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तपास अधिकारी शरद लोकरे हे पुढील तपास करत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

