कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्री साईबाबा सेवा भक्त मंडळ बांदा आळवाडा या मंडळाला सायरन भेट.

🟥श्री साईबाबा सेवा भक्त मंडळ बांदा आळवाडा या मंडळाला सायरन भेट.

🟥नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी….बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस

🎴बांदा,७जुलै : एक वर्षात बांदा वासियांचे आपुलकीमुळे खुप जवळचे नाते निर्माण झाले आहे.पुढे पुरस्थीती निर्माण झाल्यास योग्य नियोजन केले आहे. सायरन मुळे नागरीकांना सतर्कतेचा ईशार मिळणार आहे. तरी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील व घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी.स्थानिक नागरीकांनी घाबरुन जाऊ नये.असे आवाहन बांदा सहाय्यक पोलीस निरिक्षक श्यामराव काळे यांनी केले.
श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा आळवाडा येथे बुधवारी सायंकाळी सायरनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते.
बांद्यात गेले दोन वर्षे पुरस्थीती होऊन बांद्यातील तसेच परिसरातील व्यापार्यांचे अतोनात नुकसान झाले होते.आपत्ती व्यवस्थापन भाग म्हणुन बांदा शहरातील व्यापारी वर्गाला व जनता जनार्दनाला पाऊसाळ्यात तेरेखोल नदीला येणा-या पुराच्या पाण्याचा तडाखा बसु नये, व्यापारी सतर्क व्हावे.सावध करता यावे यासाठी सिंधुदूर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्यातून श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा या मंडळाला सायरन भेट देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,सरपंच अक्रम खान,ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, बाळु सावंत, मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, संकल्प केसरकर,मंगलदास सांळगावकर, दर्शना केसरकर, गाैरांग शेर्लेकर विलास आळवे, साई तेली, रविंद्र मालवणकर, राजेश कारेकर, प्रितम हरमलकर,, संदेश‌ पावसकर, मनोज कल्याणकर ज्ञानेश्वर केसरकर,सतीश नाटेकर,गौरांक शेर्लेकर,रुषी हरमल कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!