Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलीस दत्ता देसाई यांचे आंबोली ग्रामस्थांकडून कौतुक..

🟥महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलीस दत्ता देसाई यांचे आंबोली ग्रामस्थांकडून कौतुक..

🟥 देसाई यांचा आंबोली आणि गेळे ग्रामस्थांकडून करण्यात आला सत्कार.

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,५जुलै : येथील हिरण्यकेशी नदीपात्रातून पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलीस दत्ता देसाई यांचे आंबोली ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तर गेळे येथील ग्रामस्थांनी हनुमानाची मूर्ती भेट दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, , आंबोली दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते, सामाजिक कार्यकर्ते सागर ढोकरे, बाबुराव गवस, • रंजन बंड, तुषार बंड आदी उपस्थित होते. आंबोली येथील हिरण्यकेशी नदीपत्रात कणकवलीतील एक पर्यटक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.
ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली होती. सुदैवाने तिच्या हाती झाडी लागल्यामुळे पुराच्या पाण्यात “त्या” स्थिरावल्या. मात्र प्रवाह मोठा असल्यामुळे त्यांना पुरा बाहेर येता येत नव्हते. यावेळी पाण्यात उतरण्याचे कोणीच धैर्य दाखवले नाही. यावेळी त्या ठिकाणी पोलीस देसाई आल्यानंतर त्यांनी तिच्या पतीचा व मुलाचा आक्रोश पाहून स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात उडी टाकली. व सुखरूप” त्या” महिलेला बाहेर काढले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एका महिलेचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!