महाराष्ट्रमुंबईशासकीयसामाजिक

शरद पवारांबाबाची आक्षेपार्ह पोस्ट केतकी चितळेला पडली महागात..

🟥 शरद पवारांबाबाची आक्षेपार्ह पोस्ट केतकी चितळेला पडली महागात..

🟥 अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत “चितळे” यांची कोर्टात धाव

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई,१७जुन : गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या
राजकारणात केतकी चितळे हे नाव सतत वादात आहे. शरद पवारांबाबाची आक्षेपार्ह पोस्ट केतकी चितळेला जेलवारीपर्यंत घेऊन गेली. केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात तर धाव घेतलीच आहे. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरणं नवं ट्विट घेताना दिसून येतंय. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढणार का? असाही सवाल या नोटीसीनंतर विचारण्यात येत आहे. त्यामुळे महिला आयोग यात काय भूमिका घेतोय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
*काय आहे केतकी चितळे प्रकरण?*
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यानंतर केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तिला सर्वात आधी नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिचा ताबा हा ठाणे पोलिसांना देण्यात आला. त्यानंतर कोर्टाने केतकीला कोठडी सुनावली. मात्र याचदरम्यान केतकीवर गुन्हे दाखल होण्याची मालिका ही सुरूच राहिली. केतकीवर राज्यात जवळपास 20 पेक्षाही जास्त ठिकाणी याच प्रकरणात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे एका अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातही तिला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं होतं. तिने अनेक दिवस हे विविध प्रकरणात जेलमध्ये घालवले आहेत.
*अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोर्टात धाव*
केतकीने आपली अटक ही बेकायदेशील असल्याचा दावा करत कोर्टात धाव घेतली. आजच तिन याच प्रकरणात हायकोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे. तसेच आता या प्रकरणात महिला आयोगानाही पाऊलं उचलायला सुरू केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या सध्या रुपाली चाकणकर आहेत. मात्र आता हे प्रकरण थेट केंद्रीय महिला आयोगाकडे गेल्याने या प्रकरणावरून राजकारणही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. केतकी चितळेने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादीही तिच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. राष्ट्रवादीने केतकी चितळेविरोधात राज्यभर आंदोलनंही केली होती. तसेच नवी मुंबई पोलिसांनाकडून केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेताना केतकीवर हल्लाही झाला होता. मात्र तेव्हाही केतकी चितळे ही हसतानाच दिसून आली होती.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!