कोकणक्रीडामहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

मुंबई विद्यापीठ क्रिकेट निवड समिती सदस्य पदी चिपळूणचे सुपुत्र संतोष चव्हाण यांची निवड

🟥मुंबई विद्यापीठ क्रिकेट निवड समिती सदस्य पदी चिपळूणचे सुपुत्र संतोष चव्हाण यांची निवड

🟥..प्रशिक्षक पदीही नेमणूक

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,१७: मुंबई विद्यापीठ महिला क्रिकेट निवड समिती सदस्य पदी चिपळूणचे सुपुत्र कोकणातील उत्कृष्ट क्रिकेट पट्टू संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे या सोबतच विद्यापीठाने मुले- मुलींच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणूनही चव्हाण यांच्यावर जबाबदारी सुपूर्द केली आहे . आमदार शेखर निकम,नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी नगरसेवक बाबू तांबे,माजी नगराध्यक्ष सुचय अण्णा रेडीज यांनीही त्यांचे या निवडी बद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
मुंबई विद्यापीठ क्रिकेट निवड समितीवर महाराष्ट्रातून एकूण ४ सदस्यांची निवड झाली असून संपूर्ण कोकणातून सदस्य पदी संतोष चव्हाण यांची एकमेव निवड झाल्याने चिपळूणच्या सुपुत्राने मुंबई विद्यापीठामध्ये जोरदार इन्ट्री केली आहे.विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रमुख श्री.आंबूर्ले यांनी चव्हाण यांना नुकतेच ८ जून रोजी निवडीचे पत्र सुपूर्द केले आहे. येत्या २१ ते २५ जून रोजी राजस्थान येथे होणाऱ्या ४० ओव्हरच्या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई युनिव्हरसीटी ची महिला क्रिकेट पट्टूची टीम संतोष चव्हाण घेऊन जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघ,गोवा क्रिकेट संघ,श्रीलंका क्रिकेट क्लब ,किंग इलेव्हन पंजाब,आयपीएल टॅलेंट हंट या संघामार्फत आजपर्यंत झालेल्या विविध ठिकाणच्या स्पर्धेत चव्हाण यांनी स्वतः मैदानात उतरून उत्कृष्ट कामगिरी केली आहे शिवाय राजमुद्रा क्रिकेट ऍकेडमी चे संस्थापक अध्यक्ष ,अँबॉस ग्रुप स्पोर्ट चे प्रमुख म्हणून कार्यरत असताना कोकणातील असंख्य तरुणांना क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठीचे त्यांचे योगदान मौलाचे आहे यातून अनेक नवतरुण क्रिकेट पट्टूना कंपनी आणि अन्य खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत चव्हाण यांच्या या कामगिरीची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने महिलांच्या क्रिकेट निवड समितीवर सदस्य आणि प्रशिक्षिक म्हणून नियुक्ती करून सन्मानित केले आहे.कोकणात क्रीडा क्षेत्रा सोबतच चव्हाण यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे ट्रस्ट मार्फत दत्तक योजनेतून अनेक मुलांचे शिक्षण सुरू आहे .कोरोना काळ, महापूर संकट या काळातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.कोकणात रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड जिल्ह्यात सर्वात प्रथम राज्यस्तरीय पहिली कोकण प्रिमियर लिंग स्पर्धा २०१४ मध्ये भरविण्याचा मान संतोष चव्हाण यांना मिळाला होता.जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष दीपक मोरे,माजी आमदार बाळ माने तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्र मंडळींनी अभिनंदन केले आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!