होडावडा येथील अवैध दारु साठा जप्त प्रकरणात शिवसेना पदाधिकाऱ्याचा सहभाग-मनीष दळवी
*🟥होडावडा येथील अवैध दारु साठा जप्त प्रकरणात शिवसेना पदाधिकाऱ्याचा सहभाग-मनीष दळवी*
*🟥 संबंधितांवर कारवाई न झाल्यास भाजपच्या माध्यमातून आंदोलन करू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 वेंगुर्ला, दि.:१६जून*
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला या प्रकरणात वेंगुर्लेतील माजी नगरसेवक असलेल्या एका शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला आहे. दरम्यान शिवसेना नेत्यांकडून हा सर्व प्रकार दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु संबंधितावर कारवाई न झाल्यास भाजपच्या माध्यमातून आंदोलन करू, असा इशाराही श्री. दळवी यांनी दिला. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच प्रितेश राऊळ, बाबली वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, नितीन चव्हाण, शितल आंगचेकर, कृपा मोंडकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
होडावडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने छापा टाकून दोन दिवसापूर्वी २० लाख रुपयांचा
बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला. आणि त्या प्रकरणात गाडीअड्डा येथील प्रसाद मांजरेकर याचे नाव दाखवून तो फरार घोषित केला आहे. मात्र हे खोटे आहे. या अवैद्य धंद्या मागे शिवसेनेचे पदाधिकारी आणि वेंगुर्ले चे माजी नगरसेवक तुषार सापळे यांचा हात आहे. होडावडा येथील तो काजू कारखाना बंद नसून सुरूच आहे. तो सापळे यांचा असून त्या ठिकाणी सापळे यांची ये-जा असते. याप्रकरणी बनाव करून तेथील गोडाऊन भाड्या ला दिले असल्याचे भासवले जात आहे. परंतु तेही खोटे आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासन यांनी सखोल चौकशी करावी.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या होडावडा येथे दारू साठा असल्याची माहिती १५० किलोमीटर लांब असलेल्या कोल्हापूर पथकाला समजते. ती स्थानिक प्रशासनाला कळत नाही ही शोकांतिका आहे. हे गैर प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू आहेत. होडावडा येथे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने संगनमताने ती जागा सापळे यांनी घेतली आहे. दरम्यान हा प्रकार घडताच सापळे यांना वाचविण्यासाठी शिवसेनेच्या एका जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याने कोल्हापूर येथे सेटींग लावली. त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ पडल्यास आम्ही तीही बाहेर काढू.
काही दिवसांपूर्वी सावंतवाडी येथे शिवसेनेच्या कोठावळे पदाधिकाऱ्याच्या गाडीत दारूसाठा सापडला तर आता होडावडा येथे शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांच्या काजू कारखान्या समोर दारू साठा सापडला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे काळे धंदे सुरू आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून सापळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा श्री. दळवी यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

