अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढ आणि पेन्शन या मागण्यांसाठी कमलताई परुळेकर आणि एम ए पाटील यांनी घेतली नीलम गोऱ्हे यांची भेट
🟥अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढ आणि पेन्शन या मागण्यांसाठी कमलताई परुळेकर आणि एम ए पाटील यांनी घेतली नीलम गोऱ्हे यांची भेट
🟥महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी प्रश्नावर लवकर बैठक घेऊ डॉ नीलम गोऱ्हे
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,१४: महाराष्ट्रात असलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या मानधन वाढ आणि पेन्शन आणि इतर मागण्याचे प्रश्न पण प्रलंबित आहेत या प्रश्नावर राज्य शासनाने प्रभावी भूमिका घ्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधानभवनात डॉ नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्या प्रश्नांच्या दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी लवकरच महिला बालकल्याण विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी एम ए पाटील , कमलताई परुळेकर, चेतना सुर्वे, अपर्णा पानसरे यांचे एक शिष्टमंडळ विधानभवनात बैठकीसाठी उपसभापती डॉ गोऱ्हे यांना भेटले होते यावेळी या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ गोऱ्हे यांनी याविषयी योग्य ती माहिती संबंधित विभागाकडून घेण्यात येईल त्याकरिता आवश्यकता भासल्यास महिला बालकल्याण विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक घेण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले या संघटनेने नीलम गोऱ्हे यांना एक निवेदन दिले आहे.
त्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८६०० कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत अल्प असल्याचे यांचे म्हणणे आहे .या कर्मचाऱ्यांना पेमेंट ऑफ ग्राच्युईटी कायदा १९७२ लागू असल्याचा निर्णय न्यायालयाने दिलेचे निवेदनात नमूद केले आहे या कर्मचारी वर्गाला कायम कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा तसेच शासकीय वेतन आणि भत्ते मिळावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे. महाराष्ट्र वगळता आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक ,पांडेचरी या राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना तुलनेने जास्त मानधन मिळत असल्याचे त्या निवेदनात म्हटले आहे यासोबत पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवावी नवीन मोबाईल पोषण ट्रॅकर अप्लीकेशन साठी रक्कम देण्याबाबत मागण्या तसेच गणवेश रजा आणि भत्ते लवकरात लवकर मिळण्याबाबत मागण्या या संघटनेने केले आहेत.
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_