बोअरचार्जर उपक्रमाबाबत अर्चना घारे यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा

🟥बोअरचार्जर उपक्रमाबाबत अर्चना घारे यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा

🟥सामाजिक नवोपक्रम प्रोजेक्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्ग,दि.११: बोअरचार्जर हा भारतातील पाण्याची कमतरता असलेल्या भागात कोरड्या पडलेल्या पिण्याच्या, घरगुती आणि सिंचनाच्या बोअरवेलला पुनरुज्जीवित करण्याचा एक जलद, परवडणारा आणि स्मार्ट मार्ग आहे. हा उपक्रम सर्वांसाठीच फायदेशीर असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्टच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मंत्री जयंत पाटील यांना या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हा उपक्रम राज्यभरात राबविल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. बोअरचार्जरमुळे पंपिंग वेळेत वाढ, पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि पाणीपुरवठ्याचे आयुष्य वाढते. या सर्वांचा परिणाम म्हणजे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते.

बोअरचार्जर हे एक स्मार्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्र आहे. जे बोअरवेलच्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण 2 ते 20 पटीने वाढवते. 4 ते 60 लाख लिटरने प्रमाण सुधारते आणि पाण्याच्या गुणवत्तेसह 1 ते 6 महिन्यांपर्यंत पाणी पुरु शकते. उथळ भागात पावसाचे पाणी साठवण्यास मदत होते. तसेच कोणत्याही प्रयत्नाशिवाय भूजलसाठ्यांचे पुनर्भरण होऊन बोअरवेल अधिक टिकाऊ बनते. याशिवाय बोअरवेलचे पुनर्भरण नैसर्गिक पुनर्भरणाच्या 4 ते 20 पट

वाढते. बोअरचार्जर बोअरवेलमध्ये 2 लाख ते 80 लाख लिटर पावसाच्या पाण्याचे कृत्रिम इंजेक्शन रिचार्ज करते. त्यामुळे कोरड्या पडलेल्या आणि कमी पाणी देणारया बोअरवेलच्या पुनरुज्जीवनात 90 टक्के यश मिळते. सुधारित सिंचन, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढते. विरघळलेल्या क्षारांमुळे मातीचे क्षार कमी होऊन मातीचे आरोग्य सुधारणे. सुधारित जलपातळीमुळे पंपिंगसाठी लागणाऱ्या ऊर्जेची गरज 30 टक्क्यांनी कमी होते.

विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्यास टँकरने पाणीपुरवठा आणि पाणीप्रक्रिया, यावर होणाऱ्या खर्चात कपात होऊ शकते. अशी माहिती अर्चना घारे यांनी जयंत पाटील यांना दिली.

बोअरवेल प्रोजेक्टची सर्व माहिती घेतल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी, ‘हा उपक्रम सर्वांच्याच फायदा असून सुरुवातीला सांगली येथे आपण हा प्रयोग राबवू,’ अशी सकारात्मकता दर्शवली.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!