कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजप प्रवक्त्यांच्या अशोभनीय आणि अपमान जनक वक्तव्यामुळे आपल्या भारत देशावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली.. डॉ.जयेंद्र परुळेकर

🟥भाजप प्रवक्त्यांच्या अशोभनीय आणि अपमान जनक वक्तव्यामुळे आपल्या भारत देशावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली.. डॉ.जयेंद्र परुळेकर

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,७ जुन: भाजपच्या वाचाळवीर प्रवक्त्यांच्या अशोभनीय आणि अपमानजनक वक्तव्यांमुळे आपल्या भारत देशावर अनेक आखाती देशांची माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे.
आखाती देशांबरोबर क्रुड तेलाबरोबरच अनेकविध गोष्टींची भारताची असलेली वार्षिक ९० बिलियन डॉलर्सची आयात निर्यात आणि आखाती देशात कामानिमित्त असलेले जवळपास ७६ लाख भारतीय नागरिक (ज्यामध्ये लाखो हिंदू कामगार देखील आहेत) हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारला माफी मागणे भाग पडले आहे.
अशा पध्दतीने माफी मागावी लागणे ही देशावर ओढवलेली नामुष्की आहे. असे मत शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
जगातील जवळपास ५७ इस्लामी देश (OIC) आज भारतात चाललेल्या मुस्लिम विरोधी वातावरणाविरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत.
कोरोना महामारीतून देश नुकता आर्थिक दृष्ट्या हळूहळू बाहेर येत असताना देशाला या सर्व इस्लामी देशांची नाराजी पत्करणे परवडणारे नाही.
पण या निमित्ताने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
१) आपल्या देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांचा फोटो एका आखाती देशात कचऱ्याच्या डब्यांवर लावला जाणं हा आपल्या देशाचा घोर अपमान नाही का?
अशा प्रकारांवर तात्काळ आळा घालण्यात येणं गरजेचं असून कुवेत सरकारने झाल्या प्रकाराबद्दल भारताची आणि पंतप्रधानांची माफी मागणे आवश्यक नाही का?
तशी मागणी आपले परराष्ट्र मंत्रालय करणार का?
२) गेल्या काही काळात आपल्या देशात मुस्लिम विरोधी वातावरण जाणीवपूर्वक विषारी करणाऱ्या अनेक भाजपच्या नेत्यांवर,धर्मसंसदें मधून मुस्लिम विरोधी गरळ ओकणाऱ्या स्वयंघोषित महंतांवर, आपल्या टीआरपी वाढवण्यासाठी चर्चा घडवून मुस्लिम विरोधात वातावरण तयार करणाऱ्या अनेक वृत्तवाहिन्यांवर केंद्र सरकार कडक कारवाई करणार का?
(ज्या वृत्तवाहिनीवरील वक्तव्यामुळे एवढा गदारोळ झाला त्या टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या नविका कुमार या ॲंकरवर केंद्रीय सुचना मंत्रालय कडक कारवाई करणार का?)
३) गेल्या अनेक वर्षांमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात,बहारिन वगैरे अनेक देशांनी पंतप्रधान मोदी यांना बहाल केलेले सर्वोच्च नागरी सन्मान निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या सन्मानासाठी पंतप्रधान परत करणार का?
४) दिलगिरी व्यक्त करणाऱ्या माफीपत्रांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने भारत देश हा “सर्व धर्म समभाव पाळणारा आणि सर्व धर्मांचा आदर सन्मान करणारा देश आहे” वगैरे नमुद केले आहे.
मग या संविधानात्मक बाबींचे काटेकोर पालन होण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध राहील का? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!