कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 देऊळवाडी आरोग्य वर्धिनी केंद्र व देऊळवाडी अंगणवाडी कडे जाणारा रस्ता डांबरीकरणा अभावी दुर्लक्षित..

 

🟥 स्थानिक युवकांकडून मळगांव ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेकडे मागणी..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-३० :- रस्ता तयार झाला. या रस्त्यावरुन ग्रामस्थांची तसेच या ठिकाणी असलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्र,देऊळवाडी मळगांव कडे ये-जा करणारे रुग्ण यांच्यासहित या केंद्राच्या बाजूलाच असलेल्या अंगणवाडी, देऊळवाडी या अंगणवाडी शाळेत ये-जा करणारे छोटे-छोटे विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची ये-जा सुरु झाली. त्याचप्रमाणे या रस्त्याने स्थानिक ग्रामस्थांची ये-जा व त्यांच्या वाहनांची रहदारी सुरुही झाली. मात्र हा रस्ता तयार होऊन तीन वर्षे उलटली तरी या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने मागील तीन वर्षांपासून या रस्त्यावर दर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. याबाबत मळगांव ग्रामपंचायती कडे कैक अर्ज विनंती करुनही याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची तक्रार येथील स्थानिक युवकांनी केली आहे. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणा बाबत कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने या वर्षीही या सर्वाना पावसाळ्यात चिखल व खड्डयातून कसरत करावी लागणार असल्याचे सुर उमटत आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा परिषद अनुदान 2017-2018 या कामातून मळगांव देऊळवाडी नेमळे मुख्य रस्ता ते अंगणवाडी आरोग्य केंद्र रस्ता काँक्रिट गटार बांधणे या कामा अंतर्गतच्या या रस्त्यासाठी अंदाजे 1 लाख 75 हजार एवढी अंदाज पत्रक रक्कम (वर्ष 2017-18) खर्च करुन 31 मार्च 2018 रोजी काम पूर्ण करण्यात आले.या रस्त्याचे उदघाटन ही ताबडतोब करण्यात आले. हा रस्ता तत्कालीन मळगांव सरपंच यांच्या मक्तेदारी अंतर्गत येथील जुन्या पाणंदीतून तयार करण्यात आला असून हा रस्ता साधारण 3 मीटर रुंद व 250 मीटर लांबीचा आहे. मात्र स्थानिक आमदार दिपकभाई केसरकर यांच्या व शिवसेना नेते रुपेश राऊळ यांच्या कार्यकाळातील हा रस्ता तयार करुन व उदघाटन करुन तीन वर्षे उलटली तरीही पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून जिल्हा परिषद मार्फत मळगांव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या डांबरीकरण व गटार व्यवस्थीत बनवून या रस्त्याने ये-जा करणारी अंगणवाडीतील छोटी छोटी मुले व रुग्ण,गर्भवती महिला यांची सोय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून दिसत नाहीत.या रस्त्याच्या डांबरीकरणा बरोबरच गटार व्यवस्था करण्यासाठी येथील युवक व ग्रामस्थ यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणा साठी मळगांव ग्रामपंचायतीमध्ये कैकवेळा अर्ज विनंती केली.मात्र हा रस्ता डांबरीकरण करण्यात तसेच हा गटार बंदीस्त करण्यात विलंब लावला गेला आहे.

आता यावर्षीचा पावसाळा जवळ आला असल्याने व पावसाळ्यात परिस्थिती बिकट बनणार असल्याचा धोका देऊळवाडी येथील ग्रामस्थ संदिप राऊळ,सचिन राऊळ, अशोक राऊळ,घन:श्याम काळोजी राऊळ,सुदेश राऊळ, कृष्णा राऊळ, राघोबा राऊळ ,नंदकिशोर राऊळ, संदेश राऊळ, प्रताप राऊळ व या मार्गाने ये-जा करणाऱ्या देऊळवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

📱9422436090

📱9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!