आरोग्यकोकणशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजगाव वेतोबा मंदिर सभागृह येथे शास्त्रीय गायन व नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन

🟥आजगाव वेतोबा मंदिर सभागृह येथे शास्त्रीय गायन व नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन

🟥विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व चषक*

🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२२मे: श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग व आजगाव येथील स्वयंभू कला क्रीडा मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने राधाकृष्ण चषक 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 28 मे व रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
श्रीदेव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव या अंतर्गत शनिवार दिनांक 28 मे 2022 रोजी शास्त्रीय गायन स्पर्धा ( हिंदुस्थानी ख्याल ) तर रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी सवेष साभिनय नाटयगीत स्पर्धा घेण्यात येणार आहे.
शास्त्रीय गायन स्पर्धा ( हिंदुस्थानी ख्याल ) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील निवासी स्पर्धकांसाठी मर्यादित असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 5 हजार 501रुपये व राधाकृष्ण चषक असे तर व्दितीय पारितोषिक 3 हजार 501रुपये व सन्मानचिन्ह असे असून तृतीय पारितोषिक 2 हजार 501रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक 1हजार 501रुपये तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक 1 हजार 101 रुपये असून प्रवेश शुल्कासहित प्रथम नावनोंदणी करणाऱ्या 17 स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.
सवेष साभिनय नाटयगीत स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. लहान गटात गट वयोमर्यादा 8 ते 16 वर्षे असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 3 हजार 333 रुपये व राधाकृष्ण चषक, तर व्दितीय पारितोषिक 2 हजार 222 रुपये व सन्मानचिन्ह असून तृतीय पारितोषिक 1 हजार 111 रुपये व सन्मानचिन्ह आहे. या शिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक असे स्वरूप आहे. दोन्ही गटात प्रवेश शुल्कासहित प्रथम नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकी 15 स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी हेमंत दळवी मो. क्र. 9423585792 व सौ.वीणा दळवी मो. क्र. 9423819092 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!