१० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ऐवजी नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालामार्फत ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्कासह दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यंत अर्ज करता येतील. तर विलंब शुल्कासह दिनांक ३० ऑक्टोबर २०२० ते २ नोव्हेंबर २०२० रोजी पर्यंत अर्ज करता येतील. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दिनांक ३ नोव्हेंबर २०२० ते दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी पर्यंत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. तर गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी पर्यंत माध्यमिक शाळा, उच्च माध्यामिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जामा करावयाच्या आहेत.
या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी.
श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० व फेब्रुवारी-मार्च २०२० अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्राने ऑनलाईन घेता येईल. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क प्रचलित पद्धतीने मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचाऱ्यांनी नोंद घ्यावी असे डॉ. अशोक भोसले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे हे कळवितात.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

