कोकणक्रीडादोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 अखेर साटेली-भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगणाचा मार्ग मोकळा..

🟥 पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार ; कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण 

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१९ :- साटेली-भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगणाचा मार्ग मोकळा झाला असून कामास मंजुरी मिळाली असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली.
या नियोजित तालुका क्रीडांगणासाठी माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी हे नियोजित तालुका क्रीडांगण मंजूर केले होते. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामास बराच कालावधी लोटला. प्रत्यक्ष काम करण्याच्या मागणीसाठी साटेली भेडशी उपसरपंच गणपत डांगी यांनी ग्रामस्थ तालुक्यातील क्रीडाप्रेमी या सर्वांना सोबत घेत प्रजासत्ताक दिनी उपोषण केले होते.यानंतर या क्रीडांगणाच्या पुढील प्रशासकीय बाबी मंजुरी साठी आमदार दिपक केसरकर ,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण , उप अभियंता श्री.बडे आदी कडे श्री.डांगी हे सातत्याने पाठपुरावा करत होते.अखेर आमदार केसरकर यांनी या क्रीडांगणाच्या कामासाठी सकारात्मकता दाखवून प्रत्यक्ष कामाची मंजुरी मिळवली. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर साटेली-भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगणाच्या कामास पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होणार असून त्याबाबतच्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या आहेत. तसे आज पत्रही प्राप्त झाले.
या क्रीडांगणाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणारे साटेली भेडशी ग्रामस्थ,सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तालुक्यातील क्रीडाप्रेमी, राजकीय पदाधिकारी, युवक वर्ग यांनी क्रीडांगणाच्या प्रत्यक्ष कामाचे पत्र प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त केले.
येत्या पावसाळ्यानंतर साटेली-भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे पत्र प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्ष क्रीडांगणाच्या
भूमीपूजनाची तालुका वासीयांची उत्कंठा पावसाळ्यानंतरच पूर्ण होईल.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!