🟥 वारंवार वीज गायब होण्याच्या प्रकाराने मळगांव मधील वीज ग्राहक हैराण..
🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे मळगांव शाखा अध्यक्ष राकेश परब यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मांडले विद्युत महावितरण अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-१९ :- सातत्याने उद्भवणारी मळगांव मधील विद्युत खोळंब्याची समस्या व विद्युत लाईनवर वाढलेली झाडे-झुडपे याबाबत कोणत्याही प्रकारची दखल
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (मर्या.) महावितरण कंपनीकडून घेतली जात नसल्याची स्थिती सद्या
सावंतवाडी तालुक्यातील गावा- गावांमध्ये आहे. ही स्थिती सर्वात जास्त प्रमाणात असलेल्या मळगांव गाव व पंचक्रोशीतील वीज ग्राहकांना वेळी अवेळी वीज गायब होण्याच्या व ऐन उन्हाळ्यात दिवस व रात्रभर पंख्याशिवाय राहावे लागत असल्याने या उकाड्याने असह्य वीज ग्राहकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नुकतीच मळगांव विभागीय व तालुका तसेच जिल्हास्तरीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन वीज खोळंबा व वाढलेली वीज वाहिनीवरील झाडे-झुडपे याबाबत चे गाऱ्हाणे मांडले.
यावेळी मनसेचे मळगांव शाखा अध्यक्ष राकेश परब ,माजी उपजिल्हाअध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, उपतालुकाअध्यक्ष सुधिर राऊळ, प्रथमेश राणे, केतन सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मनसेच्या या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मळगांवातील वीज खोळंबा व विद्युत वाहिनीवरील वाढलेली झाडे-झुडपे पावसाळ्यापूर्वी तोडून मोठी संभाव्य हानी व मळगांव मधील वीज ग्राहकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी, असे गाऱ्हाणे मांडले. तसेच मळगांवमध्ये येणाऱ्या मेन लाईनवरची झाडी तोडून विद्युत वाहीनी पावसाळ्यापुर्वी मोकळी व सुस्थितीत करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मळगांव मधील ट्राॅन्सफार्मर मध्ये होणाऱ्या वारंवारच्या बिघाडाबरोरच वीजेचा जो दिवसभर खोळबा होतो तो कसा होतो? का होतो? कुठे होतो? याबाबत चौकशी होऊन ही बाब ग्राहकांना समजणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. तसेच ट्राॅन्सफार्मर मध्ये होणारा बिघाड व त्यामधील फ्युज चे तुकडे होईस्तोवर त्याच फ्युजचा वापर केला जातो या निष्काळजीपणा चौकशी व्हावी अशी मागणी करतानाच या मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी, “या वारंवार होणाऱ्या बिघाडाची लवकरात लवकर कायमस्वरूपी दुरूस्ती करून ग्रामस्थांना समाधानी करण्यात यावे,अन्यथा गावातील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान या वीज खोळंबा व वाढलेली झाडे-झुडपे याबाबतचे हे वृत्त संकलन करत असतानाच तब्बल दोन वेळा मळगांव येथील निवासस्थानासहीत संपूर्ण मळगांवातील वीज खंडीत होण्याचा प्रकार घडला. तब्बल एक तास हा खेळ खंडोबा कायम होता. तब्बल तासाभराने वीज पुरवठा पुर्ववत झाला. मात्र असा वीज खोळंबा मळगांव मध्ये वारंवार म्हणण्यापेक्षा रोजच होत असतो याची दखल घेण्याची वीज ग्राहकांची मागणी आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ*
*येथे “ग्रामीण करियर एजंट” नेमणे आहेत..!!!*
=======================
*वेतन मासिक ₹5000 + कमिशन + बोनस*
*शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू*
=======================
*पात्रता-*
*कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी*
*शैक्षणिक अर्हता-*
*12 वी पास / पदवीधर*
=======================
*वयोमर्यादा-*
*खुला- 18 ते 35 वर्ष.*
*मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.*
=======================
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*
*15/05/2022*
*लेखी परीक्षा व मुलाखत -*
*22/05/2022*
*ठिकाण -*
*कुडाळ LIC कार्यालय*
=======================
*वरील पात्रता धारक गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)*
=======================
*उमेश गावडे*
*विकास अधिकारी,*
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
*मो. नंबर- 9421082622*
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️ *आपले Application आमच्याकडे आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

