कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ प्रदान..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ला, दि-१९ :- पत्रकारितेसोबत बाल दशावतार चळवळीला चालना देऊन अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या वेंगुर्ल्यातील पत्रकार प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ जाहिर झाला होता. हा पुरस्कार असून १४ मे रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या किरातच्या शताब्दी कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते श्री. गुरव यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

पत्रकारितेबरोबरच समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या पत्रकारांना वेंगुर्ला येथील ‘किरात ट्रस्ट‘तर्फे ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार‘ देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार, किरात व दै.लोकमतचे प्रतिनिधी आणि दशावतार कलेची आवड जोपासताना श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाची स्थापना करुन अनेक बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या, स्वतः दशावतारामध्ये पखवाज वादन व नाट्यलेखन करणा-या आणि वारकरी भजनाला उत्कृष्ट पखवाजाची साथ देणा-या प्रथमेश गुरव यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, दै. तरुण भारतचे सिधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदक शिबानी जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, किरात ट्रस्टचे विश्वस्त रघुवीर मंत्री, गुणवंत मांजरेकर, मनमोहन दाभोलकर, जे.जे.आर्टस् स्कूलचे निवृत्त प्रा.सुनिल नांदोस्कर, ऍड शशांक मराठे, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे, किरातच्या संपादक सीमा मराठे आदी उपस्थित होते.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

 

▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️

 

*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻‍💼👩🏻‍💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*

 

🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..

*किंवा*

एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..

सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.

 

*Contact :-* Hindustan Capital Securities

Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.

 

Mob: *9403367839 / 7083369430*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!