देशशासकीयशैक्षणिक

खासगी शाळांना ‘फी’ मध्ये २० टक्के कपातीचा आदेश; सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : नवी दिल्ली

🎴नवी दिल्ली,दि.२९: खासगी शाळांना ‘फी’ मध्ये २० टक्के कपात करण्याच्या कोलकाता हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कोलकाता हायकोर्टाने २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी खासगी शाळांना ‘फी’ किमान २० टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मात्र, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.

लॉकडाउनमुळे विद्यार्थी शाळेत हजर राहू शकत नसल्याने प्रयोगशाला, क्रीडा तसेच इतर सुविधांचा लाभ घेऊ शकत नसल्याने हायकोर्टाने या अनावश्यक सेवांसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नयेत असेही आदेशात सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने या निर्णयालाही विरोध केलेला नसून कायम ठेवला आहे. तसंच उच्च न्यायालयाने सध्याच्या आर्थिक वर्षात फक्त पाच टक्क्यांपेक्षा जास्त रकमेचा खर्च शाळांना करता येईल असं स्पष्ट केलं आहे.

हायकोर्टाने निर्णय देताना शाळांना नेहमीच्या दराने शुल्क आकारण्यास परवानगी देणे म्हणजे मर्यादेपलीकडे जाण्याची परवानगी देण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं. लॉकडाउनमुळे शाळांचा खर्चही कमी झाल्याकडे हायकोर्टाने लक्ष वेधलं.

सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या एका आदेशाला मात्र स्थगिती दिली आहे. या आदेशात हायकोर्टाने शाळेच्या खात्यांचं ऑडिट करण्यासाठी समिती स्थापण्यास सांगितलं होतं. तसंच ऑडिटच्या आधारे ‘फी’ कमी करण्याच्या किंवा ‘फी’ माफीसाठी पालकांच्या अर्जावर विचार करण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या.

न्यायमूर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम.आर. शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात करण्यात आलेल्या अनेक याचिकांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली असून याप्रकऱणी दीर्घ सुनावणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!