कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माडखोल धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* माडखोल धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झाली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी दुरुस्ती न करता नवीन पाईप लाईन झाल्यास कमीत कमी पाच वर्षे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळू शकते. तसेच वारंवार दुरुस्तीसाठी जाणारा शासनाचा पैसाही वाचू शकतो, असा दावा माजी सरपंच संजय लाड यांनी केला आहे. दरम्यान त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरात लवकर शासकीय मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत श्री. लाड यांनी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, लघु पाटबंधारे तलाव माडखोल धरणात उजवा आणि डावा कालवा असे दोन कालव्यात रुपांतर असून, संबंधित कालव्याच्या पाईपलाईन दुरुस्ती व पुर्नरचनेची कामे गेली दोन वर्षे सुरु असून, डाव्या कालव्याचे काम उपलब्ध मंजूर निधीतून प्रशासकाच्या निगराणीखाली सुरु असून उजव्या कालव्याचे काम उपलब्ध मंजूर निधीतून येत्या दोन दिवसात ५ में पर्यंत सुरु होणार असे समजते. उपलब्ध मंजूर निधीतून सदर काम पूर्ण झाले तरी धरण क्षेत्रातील सर्व लाभार्थी यांना पाण्याचा लाभ मिळणे कठीण आहे. कारण डाव्या कालव्याच्या उर्वरित तीन किलोमीटर भागामध्ये जुने पाईप लाईन मोडकळीस येवून कोलमडलेले आहे. व उजव्या कालव्याच्या उर्वरित अंदाजे तीन किलोमीटर भागामध्ये जुन्या पाईप लाईन मोडकळीस येवून कोलमडलेली आहे, असे दिसून येते. त्यासाठी अंदाजे रक्कम रु. साडे तीन कोटीची आवश्यकता आहे. सन 1995-96 च्या दरम्यान इंडो जर्मन पाईपलाईनचे काम झाले होते. त्यावेळी जो धरण पाईपलाईनचा प्लॅन तसेच त्यामध्ये नमूद सर्व चेंबर आणी मेन व्हॉल जेवढे असतील त्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी. आणी धरणाच्या पाण्याचा साठा पाहून आवचश्यक अशा नवीन ठिकाणाची क्षेत्राची पाहणी करून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन अंदाजपत्रक तयार करुन प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रशासकीय मंजुरी घेणे . शासनाच्या सर्वे प्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेल्या सर्व चेंबरला पाणी पोहचवून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. व कोणीही लाभार्थी शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये, उजवा व डावा कालवा साठी संपूर्ण नवीन पाईप लाईन झालेस कमीत कमी पाच वर्षे तरी शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळू शकते. तसेच वारंवार दुरुस्तीचे काम करुन शासनाचा पैसा वाया जाऊ नये, याची काळजी घ्यावी. असे म्हटले आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

9422436090/9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!