कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॅशिंग युवा नेतृत्व-महेंद्र सांगेलकर

*🟥डॅशिंग युवा नेतृत्व-महेंद्र सांगेलकर*

*🟥वाढदिवसा निमित्त जिवनकार्याचा आढावा घेणारा खास लेख*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:१२ मे*
आपल्या सामाजिक कार्याने सावंतवाडीत वेगळ स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व म्हणजे कॉंग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर…. सावंतवाडी शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच पुढे असणार नाव म्हणजे महेंद्र सांगेलकर. त्यांचा आज १२ मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे. कॉग्रेसच्या NSUI च्या विद्यार्थी संघटनेतून व कर्नल सुधीर सावंत यांच्या विचारावर प्रभावित होऊन त्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीस सुरुवात केली.तत्कालीन काॅगेसचे खासदार सुधीर सावंत यांचे काम व कार्य महेंद्र सांगलेकर यांनी आपल्या जीवनात बघितले होते. त्यानंतर आता पर्यंत गेली २०वर्ष ते कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने व कला क्रिडा,सामाजिक काम करत आहेत. गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाऊन त्यांना मदत करणे हेच ते आपले आद्य कर्तव्य मानतात. आतापर्यंत ५६ वेळा रक्तदान करून त्यांनी अनेक रुग्णांंचे प्राण वाचवले आहेत.तसेच आतापर्यंत १ हजार लोकांमध्ये रक्तदानाची जनजागृती करून त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्याची किमया त्यांनी केली. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे त्यांना रुग्णालयात दाखल करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून घेणे आणि रक्त पुरवठा करण्यासाठी मदत करणे हीच सामाजिक बांधिलकी जपणारी कामे महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या जीवनात केली. कॉंग्रेस पक्षाचे काम कार्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत नेहमीच आपल्या नेतृत्वाचा दाखला देत.कर्नल सुधीर सावंत, अँड. दिलीप नार्वेकर, तत्कालीन माजी जिल्हाध्यक्ष कै. विजयराव नाईक, तत्कालीन माजी जिल्हाध्यक्ष कै. मा. रमाकांत सावंत, पी. एफ. टान्टस, विलास गावडे, सुनील राऊळ तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि आताचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक या सर्वांचा आवडता कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.कॉंग्रेस पक्षाने केलेल्या अनेक संघर्षात, जनतेसाठी केलेल्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ही आंदोलने करताना त्यांनी पक्षासाठी अनेक पोलिस केसेस स्वतःच्या अंगावर घेतल्यात. मात्र आजही पोलीस व अधिकारी वर्गात महेंद्र सांगेलकर यांच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तेवढेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते २० वर्ष कॉंग्रेस पक्षात आत्मीयतेने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करून जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. हि जबबदारी यशस्वीपणे पार पडल्यान सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. आज हि जबबदारी ते चोखपणे पार पाडत असून सावंतवाडी तालुक्यात कॉंग्रेसची मजबूत संघटना बांधण्याचे चे काम अविरतपणे करत आहेत. युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे.
राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेते मंडळीतही मित्रत्वाच नात निर्माण केल. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला व जगाला कोरोना महामारीच्या हादरून सोडलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे कोरोना संकट गडद होत होते मात्र या परिस्थितीतही या संकटात देखील महेंद्र सांगेलकर गरजूंचा आधार म्हणून उभे राहिले.त्यांनी सावंतवाडी तालुक्यासह दोडामार्ग, वेंगुर्ला येथे देखील गरजूंना मदितीचा हात दिला. धान्य,गरजू वस्तू बरोबर त्यानी मोफत जेवण गोरगरीब लोकांना वाटत एक मदतीचा हात दिला.तर सर्वसामान्य जनतेसाठी उन्हातानात उभ्या असलेल्या पोलिस बांधवांना,डॉक्टर, नर्स यांना थंड सरबत,मोफत जेवण वाटत त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. एवढच नव्हे तर सामाजिक कार्याचा त्यांचा वसा त्यांच्या पत्नीन देखील अंगीभूत करत लॉकडाउनकाळात भुकेलेल्या मजुरांना स्वत: अन्नपूर्णा बनत त्यांना भुकेचा घास दिला. आजही सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून ते आणि त्यांचे पक्षातील सहकारी सामाजिक कार्यात आघाडीवर आहे.
2016 मध्ये गौण खनिज प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौण खनिज या बाबत झालेलं डंपर आंदोलन फार गाजलं या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अनेक जण नेतृत्व करत होते त्या नेतृत्वात महेंद्र सांगेल करांचा मोठा वाटा होता हे आंदोलन यशस्वी करत ते आपल्या डंपर आंदोलकांच्या युवा उद्योजक यांच्यात ते खंबीरपणे पाठीशी राहिले तालुक्यात कोठेही संघर्ष, वाद,हनामारी होऊ दे त्या घटनेची माहिती समजल्यावर स्वतःच्या जीवाची पर्वा करू न करता महेंद्र सांगेलकर घटनास्थळी दाखल होतात. कोणत्या प्रकारचा तो वाद किंवा संघर्ष असू दे एका क्षणात मिटवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशावेळी त्यांच्या संयमी नेतृत्वाची कस लक्षात येत. संघर्ष करण्याची जशी त्यांच्या मनगटांमध्ये ताकद आहे. हृदयामध्ये हिम्मत आहे. तशीच त्यांच्या वाणीमध्ये अर्थात शब्दामध्ये ऐवढी ताकद आहे की समोरचा किती आक्रमक झाला तरी त्याची आक्रमकता कमी करण्यात महेंद्र सांगेलकर यशस्वी होतात. त्यामुळे अशावेळी त्यांच्या कुशल नेतृत्व चा कस आपल्याला पाहायला मिळतो. आज जिल्ह्यात गौण खनिज सारखा महत्वाचा विषय असताना या क्षेत्रात काम व व्यवसाय करणाऱ्या तरुण उद्योजकांना व युवकांना महेंद्र सांगलेकर हे आपले मित्र व हमदर्दी असे वाटतात. त्यामुळे कोणतीही घटना घडली तर महेंद्र धावून येणारच या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो तरुण वर्ग त्यांच्याकडे बघत असतात.हाकेला महेंद्र सांगेलकर नेहमी तत्पर असतात. यामुळे आपल्या जीवनात काम करताना सावंतवाडी मधील एक युवा व परिपक्व नेता व कार्यकर्त्यांना नेहमी पाठीशी घेऊन पुढे जाणारा नेतृत्व म्हणून महेंद्र सांगलेकर यांची ओळख आहे.त्यांच्या पाठीशी सावंतवाडीतील हजारो युवक आजही उभे असलेले पाहायला मिळत आहेत. महेंद्र सांगेलकर यांची एन्ट्री मग ती पोलीस स्टेशनला होवो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही कार्यालयात होवो त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले जाते.आणि त्यांच्या मतांचा विचार पोलीस आणि अधिकारी करत असतात. यात त्यांच्या नेतृत्वाच्या कलागुणांची कस लागते. असा हा झुंजार नेतृत्वाला,समाजिक कार्याचा वसा घेऊन कार्यरत असलेल्या डॅशिंग युवा नेते महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!