कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

अर्चना फाउंडेशन देणार कोकणवासींयाच्या आयुष्याला ‘आधार’!

*🟥अर्चना फाउंडेशन देणार कोकणवासींयाच्या आयुष्याला ‘आधार’!*

*🟥आधार अभियान :* *बुधवारपासून दोडामार्ग येथून प्रारंभ, नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज- कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:११ मे*
डोंगर-दर्‍यांनी व्यापलेल्या, सोयीसुविधांचा अभाव असलेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आधार अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवार, दि. 11 मे 2022 रोजी दोडामार्ग येथून या अभियानास प्रारंभ होणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, गरजूंना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आधार अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनने मदत केंद्रे सुरु केली आहेत. पहिला टप्पा दि. 11 ते 15 मे दोडामार्ग केंद्र, दुसरा टप्पा दि. 16 ते 22 मे वेंगुर्ले केंद्र आणि तिसरा टप्पा दि. 23 ते 31 मे सावंतवाडी केंद्र, अशा प्रकारे आधार अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अर्चना घारे यांनी दिली.
अर्चना घारे म्हणाल्या की, कमी लोकसंख्येची छोटी-छोटी गावं डोंगरांच्या कुशीत विसावलेली आहेत. डोंगरी भाग असल्यामुळं या भागात उत्पन्नाची साधनं देखील कमी आहेत. उद्योग-व्यवसाय कमी असल्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, याची शाश्वती नाही. अशावेळी नागरिकांसाठी शासकीय योजना लाभदायी ठरतात. केंद्र आणि राज्य शासनाने विविध जनकल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा लाभ घेतला तर जगणं सुसह्य होऊ शकतं. परंतु अनेकांना शासकीय योजनांची माहिती नसते. लोकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी अर्चना फाउंडेशनने हा लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतला आहे.
समाजातील निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी शासकीय योजना फायदेशीर ठरत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी शासन विविध विभागांमार्फत योजना राबवत असते. जसे व्यावसायिक विभाग, शैक्षणिक,आरोग्य, सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास, बाल विकास, सामूहिक विकास, कृषी विकास, ग्रामीण विकास, वैयक्तिक लाभ, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, क्रीडा विषयक व इतरही अनेक लोककल्याणकारी योजना आखल्या गेल्या आहेत. परंतु सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.
अर्चना फाउंडेशनने एक माहितीपत्रक तयार केले आहे, ज्यामध्ये आठ महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम कार्ड योजना, सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान किसान योजना केवायसी, तसेच नवीन आधारकार्ड काढणे व दुरुस्ती करणे, नवीन मतदान ओळखपत्र काढणे व दुरुस्ती करणे, नवीन पॅनकार्ड काढणे व दुरुस्ती करणे अशा योजनांचा समावेश आहे. ही पुस्तिका घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी अर्चना फाउंडेशनने सुरू केलेल्या आपल्या जवळील मदत केंद्रावर जाऊन योजनांचा माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन अर्चना घारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस अर्चना फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!