कोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्ष आणि कार्यवाहकांनी आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे सादर केली.

🔴सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्ष आणि कार्यवाहकांनी आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे सादर केली.

🟥असा आरोप फेडरेशनचे संस्थापक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,८ मे : कोकणात देव-देवस्की जशी प्रसिद्ध आहे तसेच भूत आणि भुताटकीही सुप्रसिद्ध आहेत. परंतु या सर्व गोष्टींना काल्पनिकतेची झालर असली तरी या पेक्षाही भयावह प्रकार सावंतवाडीत घडला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्ष आणि कार्यवाहकांनी आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केली. हा प्रकार माहीती अधिकारात उघड झाला, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत फेडरेशनचे संस्थापक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केला. दरम्यान या प्रकाराचा ठपका ठेवून ही कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करण्यात यावी, तसेच जबाबदार असणाऱ्या कार्यकारणी सदस्यांसह धर्मादाय आयुक्ततांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी आपण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रसाद अरविंदेकर, नंदन वेंगुर्लेकर, जितेंद्र म्हापसेकर, आर. डी. बांदेकर, जावेद शेख, विकी केरकर, एस. ए. लाखे, हनुमंत कारीवडेकर, नरेंद्र मुळीक आदी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 1983 साली स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेच्या आजीव सभासद पदी सावंतवाडी येथील वसंत सिताराम केसरकर उर्फ अण्णा केसरकर यांची निवड करण्यात आली होती. असे असताना सध्या या मंडळाचे कार्यवाह असलेले दिनेश वामन चव्हाण यांनी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेच्या कार्यवाह या नात्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्ग यांची न्यायालयात चौकशी क्रमांक 335/2018 हा अर्ज रजिस्टर नोंदविललेला नोंदीत बदल करण्यासाठी दाखल केलेला होता. सदर नोंदणी अर्जात निशान क्रमांक 18 येथे आवश्यक सभासद यादी साक्षांकित प्रत सदरहू इसम दिनेश वामन चव्हाण यांनी 20 फेब्रुवारी 2019 रोजी दाखल केली. सदर सभासद यादीपैकी आजीव सभासद असलेल्या व नवीन समाविष्ट असलेल्या यादीत अनुक्रमांक नंबर सm07 येथे अण्णा केसरकर यांच्या नावासमोर शेरा ‘निधन सभासदत्व रद्द’ असा नोंदवून आजीव सभासद असलेल्या अण्णा केसरकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हा खोटा मजकूर नमूद करण्यापूर्वी सदर संस्थेचे कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी कोणतीही शहानिशा अगर खात्री केली नाही व आपले नाव जाणीवपूर्वक संस्थेच्या आजीव सदस्य यादीतून कमी करून आपली तसेच इतर सदस्य व सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्ग यांनी. फसवणूक केली असा आरोप
केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान सिंधुदुर्ग कबड्डी
फेडरेशन सावंतवाडी या संस्थेच्या आजीव सभासद यादीत आपल्याला मयत दाखवून कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी आपली फार मोठी फसवणूक केली आहे. तसेच सिंधुदुर्ग धर्मादाय आयुक्तांचीही फसवणूक केल्याप्रकरणी व खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी या संस्थेचे कार्यवाह दिनेश चव्हाण व विद्यमान सर्व कार्यकारणी सदस्य यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे असे पत्रकार परिषदेत वसंत केसरकर यांनी स्पष्ट केले.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!