कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी सौ अर्चना घारे परब यांच्या निवडीचे राष्ट्रवादी कडून स्वागत
*🟥कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी सौ अर्चना घारे परब यांच्या निवडीचे राष्ट्रवादी कडून स्वागत*
*🟥सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करून आमदार विजय होईल, उमेदवार अर्चना घारे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.६ मे:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी सौ अर्चना घारे परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी ही निवड केली आहे. अर्चना घारे यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून उमेदवार अर्चना घारे परब असतील असे ते म्हणाले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,बाळ कनयाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दिलीप घारे उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी नवनियुक्त कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी सौ नमिता अर्चना घारे परब यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून अभिनंदन करण्यात आले.
अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड केली आणि प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकण विभागीय अध्यक्षपदी सौ अर्चना घारे परब यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी साथ देतील असे अमित सामंत यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद प्रस्थापित करण्यासाठी अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जाणार असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्या विजयी होतील अशी पुढील काळामध्ये पक्षबांधणी कारण केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे अमित सामंत यांनी सांगितले.
नवनियुक्त कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब म्हणाल्या, पक्षाध्यक्ष शरद पवार, महिला पक्षाध्यक्ष फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. तसेच कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो अशी संघटना बांधली जाईल असे सौ अर्चना घारे परब म्हणाल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

