कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पर्यावरणीय बदलामुळे आंबा बागतदार चिंतेत;आंबा फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला

*🟥पर्यावरणीय बदलामुळे आंबा बागतदार चिंतेत;आंबा फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,६मे:* पर्यावरणातील बदलामुळे आंबा बागायतीवर मोठा परिणाम झाला असून बागायतदार शेतकरी आर्थिक चिंतेत आहे. सध्या आंबा फळमाशी ला बळी पडत असल्याचे देखील चित्र आहे. दरम्यान अक्षय तृतीयेच्या नंतरचा पिकलेला आंबा हा चवदार असेल असा दावा प्रगतशील शेतकरी बाळासाहेब परुळेकर यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे आंबा बागायतदार आणि खवय्ये यांच्यामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला होता. करोनाच्या सावटा नंतर सर्व बाजारपेठ खुली झाली असून आंबा बागायतदार मात्र आर्थिक चिंतेत आहे.

यंदा अवकाळी वादळ वारा पाऊस, दमट हवामान, उष्णता अशा विविध संकटांना आंबा बागायतदार सामोरा गेला आहे. अवकाळी वादळी पावसामुळे मोहोर, फळगळ देखील झाली.या बदलत्या हवामानामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गेल्या काही दिवसात बाजारपेठांमध्ये आंबा येत आहे मात्र आंब्याच्या बाजारपेठात वासाचा घमघमाट नाही तसेच आंबा फळ चवदार नाही किंवा फळ कापल्यानंतर आत मध्ये साख्या किंवा ते फळ खराब निघालेले असते अशा अवस्थेत खवय्ये नाराज आहेत.
आंबा नैसर्गिक परिपक्वता नाही. लवकरच आंबा परिपक्व व्हायला हवा म्हणून वेगळे प्रयोग केले जातात. तो मार्केटमध्ये नेला तर चांगली किंमत मिळते म्हणून अनैसर्गिक रित्या पिकवून तो बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे आंब्याला चव नसावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंबा पिकविण्यासाठी काही प्रमाणात रसायन वापरले जाते.
आंबा बागायतदार बाळासाहेब परुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अवकाळी पाऊस, दमट हवामान, उष्णता अशा विविध कारणामुळे आंबा बागायतदारावर आर्थिक संकट आले आहे. या कारणामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव देखील निर्माण झाला आहे. फळमाशी आंब्यामध्ये अळी घालते. आंबा पिकल्यानंतर तो कापण्यात आल्यावर फळात अळ्या मिळतात. या फळ माशीला आंबा बळी पडला आहे. फळ माशीचा विणीचा काळ जवळ आल्याने तो धोका आंबा फळाला बसत आहे.
श्री. परुळेकर म्हणाले, अक्षय तृतीया नंतर चा पिकलेला आंबा हा चवदार आहे. सध्या कृत्रिम पद्धतीने आंबे पिकवले जात आहे. तसेच बाजारपेठेत हुबळी-धारवाड येथील आंबा येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचा आंबा बदनाम होत आहे. कोकण कृषी विद्यापीठाने फळमाशी ला काबूत आणण्यासाठी पिंजरा निर्माण केला आहे त्याचा वापर केला जातो मात्र यामुळे फळमाशी एकत्रित जमा होते ते एक संकट येत आहे.
आंबा मार्केटमध्ये नेऊन किंमत मिळत नसेल तर आंबापोळी व आंब्यापासून उत्पादने देखील घेतली तरी आर्थिक संकट दूर होऊ शकते. कोकण कृषी विद्यापीठाने १५० पेक्षा जास्त आंबा प्रजाती विकसित केल्या आहेत त्या देखील आपल्या भागांमध्ये रोपण करून बागायतदारांनी शेती करायला हवी. हापूस आंब्याला पर्याय म्हणून कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाला प्राधान्य दिले पाहिजे असे श्री परुळेकर म्हणाले.
सावंतवाडी शहरात आंबा मोठ्या प्रमाणात आवक झाला आहे. हापूस,पायरी अशा विविध प्रजातींची उपलब्धता आहे मात्र सर्व सामान्य माणसाला तो सध्या आर्थिक दृष्ट्या परवड नसल्याने कडवट ठरला आहे. आंबा लहान व मोठ्या फळा नुसार दर आहेत. सुमारे ४०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत प्रतिडझन दर आहेत. त्यामुळे तो आंबटच ठरला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!