नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेश प्रकरणी ,शिवसेनेचे आंदोलन चुकीच्या वेळी व स्थळी

*🟥नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेश प्रकरणी ,शिवसेनेचे आंदोलन चुकीच्या वेळी व स्थळी*

*🟥शिक्षणाचा अधिकार या कायद्याखाली मुलांना परीक्षेपासून रोखता येत नाही*

*🟥परजिल्ह्यातील मुले स्थानिक मुलांवर अन्याय करत असतील तर आंदोलन योग्य पण चुकीच्या वेळी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:३० एप्रिल*
नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेवर जे राजकीय धुमशान चालले आहे ते मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्या योग्य नसून लहान मुलांचे मानसिक खच्चीकरण करणारे असल्याचे आमचे ठाम मत आहे.
पर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करणारे पालक,त्या शाळेचे मुख्याध्यापक हे निश्चितपणे जबाबदार असले तरी शाळेची पटसंख्या कमी होऊन शिक्षक संख्या कमी होऊ नये म्हणून काही वेळा पटसंख्या टिकवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक असे विद्यार्थी शाळेमध्ये दाखवतात मात्र ते शाळेत उपस्थित नसतात, व नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत अशीच जिल्हा बाह्य मुले येऊन जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शिवसेना पक्षाने करून आंदोलन छेडले मात्र शिक्षणाचा हक्क या राज्य शासनाच्या धोरणानुसार एखाद्या मुलाला परीक्षेपासून वंचित ठेवता येतं नाही या निर्णयाच्या अधीन राहून पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सर्व मुलांना परीक्षेला बसायला दिले व आंदोलकांना ताब्यात घेतले.
वास्तविक सदरचे आंदोलन हे परीक्षा केंद्रावर करणे हे नियमबाह्य आहे ,एखाद्या विद्यार्थ्यांनी जर सदरच्या आंदोलकांनीआपल्याला परीक्षेपासून रोखून धरले, परीक्षेस बसू दिले नाही ,वाटेत अडवले ,अशा प्रकारची तक्रार दाखल केली असती तर या सर्व आंदोलन कर्त्यांवर शिक्षणाचा मुलभूत हक्क या कलमाखाली फास्को चा गुन्हा दाखल झाला असता,कारण कायद्यात तशी तरतूद आहे, राजकीय लोकांनी ही आंदोलने करताना कायद्याचा अभ्यास केला तर आपल्याबरोबर इतर पदाधिकारी कार्यकर्ते अडचणीत येणार नाही हे शंभर टक्के, मात्र काही ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता असेल त्या कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जाते व त्याचाच फायदा घेऊन काही कार्यकर्ते व पदाधिकारी हुल्लडबाजी करतात.
शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला आमचा मुळीच विरोध नाही, आंदोलन हे सनदशीर मार्गाने असावे व ते कोणाच्या न्याय्य हक्कांवर गदा आणणारे नसावे या मताचे आम्ही आहोत,मुले कुठून आलीत ,कुठे शिकली, या पेक्षा त्या निरागस मुलांच्या बालमनावर परिणाम होऊ नये,ज्या शाळेमध्ये सदरच्या मुलांना प्रवेश दिला जातो त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत जबाबदार धरून ज्या मुलांनी प्रवेश घेतला त्या मुलांनी याच ठिकाणी शिक्षण घेतले पाहिजे अशी अट असणे गरजेचे आहे , व तशी गोष्ट या सेना पदाधिकाऱ्यांनी त्या शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकांकडून करून घेणे गरजेचे आहे ,असे झाले तरच बाहेरील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर येथून नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत बसायला मिळावे म्हणून पाचवीत आपली मुले या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकतात असे दाखवून या शाळेमार्फत त्यांना परिक्षेस बसवले जाते, असा सेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे ,त्या आरोपाची शहानिशा करणे हे शैक्षणिक विभागाचे काम आहे,मात्र एवढे मोठे आंदोलन होणार याची कल्पना असून सुद्धा शिक्षण विभागाने लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाला काही कळवले नव्हते, माणसाचे मूलभूत अधिकार, राईट टू एज्युकेशन चा हक्क डावलून कोणी आंदोलन कर्ते काही चुकीचे करू शकत नाही व तशीच भूमिका सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी घेतली शंभर टक्के योग्य व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी केलेले आंदोलन योग्यच आहे , मात्र वेळ चुकीची, परीक्षा केंद्रावर अशा प्रकारचे आंदोलन करता येत नाही असे त्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगणारा कोणी भेटला नाही का? हा आमचा प्रश्न आहे, त्या केंद्रावर रडणारीअनेक मुले आम्ही पाहिली ,मुलांना पोलीस, आंदोलन, या सगळ्या गोष्टी नवख्या असल्यामुळे मुले गांगरली ,घाबरली, भेदरली, आणि हे कुठेतरी थांबायचे असेल तर भविष्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ,माध्यमिक शाळांनी, परजिल्ह्यातील मुलांना आपल्या शाळेत चुकीच्या पद्धतीने प्रवेश देताना शंभर वेळा विचार करावा असे आमचे स्पष्ट मत आहे,अन्यथा ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचे चुकीचे प्रवेश दिले जातात अशा शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!