कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सुंदरवाडी सावंतवाडी शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडलेल्या स्वरूपात; नियोजनाची गरज

🟥सुंदरवाडी सावंतवाडी शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडलेल्या स्वरूपात; नियोजनाची गरज

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी,३०: सावंतवाडी शहरात पर्यटन,शिक्षण, व्यापार व शासकीय कार्यालयात येणाऱ्यांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहनांची संख्या वाढत असूनही वाहन पार्किंग व्यवस्था नसल्याने चार चाकी गाडी घेऊन बाजारात आलेल्यांना पार्किंगचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील वाहतूक पोलीस व्यवस्था देखील रामभरोसे ठरत आहे.
शहरात पार्किंगसाठी नसलेली जागा आणि नो पार्किंगमध्ये होणारे बेशिस्त पार्किंग यामुळे शहरात वाहतुकी कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे,सणासुदीच्या काळात तर वाहन चालविणे अवघडच बनते त्यामुळे भविष्यात हा प्रश्न मार्गी लागणे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
पर्यटन दृष्ट्या शहराचे महत्व वाढविण्यासाठी एकीकडे सावंतवाडी नगरपालिका आणि पर्यायाने येथील राजकीय पुढारी प्रयत्न करित असतांना शहरातील समस्या मात्र त्यात मोठ्या प्रमाणात आडकाठी आणणाऱ्या ठरतात आज शहरातील इतर समस्याप्रमाणे वाहतुक कोंडी समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. पालिका प्रशासनाकडून दरवर्षी स्थानिक पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन यासाठी कागदावरच नियोजन केले जाते मात्र हे नियोजन सपशेल फोल ठरत असल्याचे चित्र नेहमी होणार्या वाहतुक कोंडीमुळे दिसून येते. आज मोती तलावाचा बाजूने नोपार्कीग असतांनाही तेथे पार्किंग केल्याचे नेहमी दिसते याकडे ना वाहतुक पोलिस कारवाई करत नाही पालिका प्रशासन लक्ष देत. या नो पार्किगच्या जागेतच दिवसभर चारचाकी तसेच मोठ्या गाड्या पार्क केलेल्या असतात त्यामुळेच वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होऊनही यावर कोणाचाच वचक दिसुन येत नाही.
शहरातील नगरपालिका रोड, मुख्य बाजारपेठ, गवळीतिठा, चिटणीस नाका, काॅलेजरोड, मिलाग्रीस रोड, बॅक ऑफ इंडीया रोड, या ठिकाणी हमखास वाहतुक कोंडी दिसून येत, याठिकाणी नेहमी पोलिस ठाण्याकडून वाहतुक पोलिस तैनात केले जातात मात्र ते फक्त शहरात एकाच ठिकाणी लक्ष ठेऊन असल्याने इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविताना वाहनधारकांना वाहतुक पोलिसांची भुमिका बजवावी लागते. बर्याचदा या वाहतुक कोंडीचा फटका रस्त्यालगतच्या दुकानदार व्यावसायिक वर्गाला बसतो. शिवाय छोटे मोठे अपघातही यामुळे घडतात एकुणच या परिस्थितीवर कोणाचीच पकड नसल्याने दिसून येते.
शहरात गणपती सणाला वाहतुकीचे नियोजन होते मात्र वर्षभर याकडे दुर्लक्ष केले जाते, शहरातील हा प्रश्न सुटण्यासाठी यात कुठेतरी बदल होणे गरजेचे आहे. मात्र वर्षातून एकदा नियोजन न होता वरचेवर त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. शिवाय वाहतुक पोलिसांनी आपली ड्युटी बजावताना त्यात कोणताही कसून सोडता कामा नये. याशिवाय पालिकेने आठवडा बाजार तसेच सणासुदीच्या दिवसात पार्किंगसाठी कायमस्वरुपी जागेचे नियोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय पालिका प्रसासनाने दुकान व्यावसायिकांनाही आपल्या गाड्या दुकानाबाहेर पार्क करतांना त्याचा त्रास वाहतुकीला होता कामा नव्हे अशी पार्क करण्याच्या सुचना द्याव्यात, बर्याच ठिकाणी दुकानाच्या बाहेर बेशिस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र हमखास दिसते, तसेच ग्राहकही आपले वाहन रस्त्यावरच लावुन खरेदी करतात यालाही खिळ बसणे गरजेचे आहे त्यामुळे पोलिसाची भुमिका येथे महत्वाची आहे. असे झाल्यास वाहतुक कोंडी ही समस्या कास्वरुपी मिटू शकेल.
शहरातील व्यापारी बांधवांनाचा टान्सपोर्टने येणार माल मोठ्या वाहनातून येतो, ही मोठी वाहने थेट बाजारपेठेत घुसवून आणि रस्त्यावर उभी करुन हा माल खाली केला जातो, याला कुठेतरी चाप बसला पाहीजे, दुकानदारांनी कीवा टान्सपोर्ट कंपनीने छोट्या वाहनातून हा माल संबधित दुकानापर्यंत पोहोचविला पाहीजे. मात्र हे होत नसल्याने सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. यासगळ्यात बदल होणे आवश्यक असून पालिका प्रशासनाने याकडे डोळसपणे बघल्यास सर्व शक्य आहे.

रस्त्यावरील अवास्तव पार्किंग पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. वाहतूक पोलीस फक्त नगरपरिषद समोर दिसतात. खरेतर गवळी तीठा, चिटणीस नाका, गांधी चौक किंवा जयप्रकाश चौक, हाॅटेल लेक व्ह्यू अशा विविध ठिकाणी हंगामात वाहतूक व्यवस्थापन आवश्यक आहे.

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!