महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे मनसे कडुन आयोजन
*🟥महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे मनसे कडुन आयोजन*
*🟥मनसे जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांची माहिती*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*
*🎴 कुडाळ, दि.:२८ एप्रिल*
कुडाळ मनसेनेच्या वतीने अक्षयतृतीयाच्या दिवशी म्हणजे तिन मे रोजी कुडाळ बाझारपेठ ,येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसा व महाआरतीचे महाआरतीचे आयोजन केले आहे. या बाबत त्यांनी कुडाळ पोलिस ठाणे येथे पत्र दिले असून यावर जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, शहराध्यक्ष सिध्देश कुटाळे यांच्या सह्या आहेत.. तर पत्र देतेवेळी रमाकांत नाईक, हेमंत जाधव, जगन्नाथ गावडे,महेश रावले, प्रथमेश धुरी यांच्या सह्या आहेत.
सकाळी 10.30 वा या महाआरती व हनुमान चालीसा पठणाला सुरुवात होईल असा कार्यक्रम आहे. …
या बाबत अधिक माहीती देताना धीरज परब म्हणाले.
गुढीपाडव्याच्या मनसेच्या जाहीर मेळाव्यात माननीय राज ठाकरे यांनी ईदपर्यंत महाराष्ट्रातील मशिदीवरून भोंगे उतरवले जावेत अशी भूमिका मांडलेली आहे. मशिदीवरील भोंगे उतरवणे हा विषय कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा असूच शकत नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याचे जीवन शांततापूर्वक जगण्याचा घटनात्मक अधिकार दिलेला आहे. सुप्रिम कोर्टानेही या विषयावर शिक्कामोर्तब करत प्रार्थनास्थळावरील भोंगे उतरवण्याचा आदेश दिला आहे. ही भारतीय नागरिकांच्या शांततामय आयुष्य जगण्याच्या अधिकाराची लढाई असून कोणताही धर्म त्याच्या आड येऊ नये. गुढीपाडव्याच्या जाहीर मेळाव्यात आणि त्यानंतरच्या उत्तरसभेत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपली हीच भूमिका स्पष्ट शब्दात व्यक्त केली असताना त्यावरून राजकारण केले जाणे दुर्दैवी आहे, मनसे कोणत्याही धर्मा विरोधात नाही अथवा प्रार्थनेच्या विरोधात नाही असे मत मनसे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी सामान्य जनतेच्या भावनांचा आदर हा करावाच लागेल. भोंग्यावरून केलेलीच प्रार्थना आपल्या श्रद्धास्थानापर्यंत पोहोचते असे कुठे आहे का? वृद्ध, आजारी रुग्ण, झोपेची गरज असलेले रात्रपाळीवरून आलेले कामगार, लहान मुले यांची झोप उडवून त्यांना मानसिक आणि शारीरिक पीडा देत केलेली प्रार्थना देवाला कशी मान्य होईल, हा प्रश्न एकदा विचारात घ्यावा व त्यानुसार भोंगे उतरवण्याचा निर्णय संबधीतानी घ्यावा..
राज ठाकरे यांची भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेला विचारात घेऊन कायद्याला अनुसरून असलेली भूमिका आहे. सणासुदीच्या चार दिवसातील उत्साह आपण समजून घेऊ शकतो, पण वर्षाचे 365 दिवस लोकांना आपल्याकडून त्रास का व्हावा.?? .. हे अयोग्य आहे. आपल्या गृहमंत्र्यांनी देखील म्हंटले आहे की आता भोंगे वाजवणाऱ्यानीच याचा स्वतःहून विचार करावा. गृहमंत्र्यांच्या भावनेचा तरी आदर करून योग्य तो निर्णय आता सर्वांनी घ्यावा अशी वेळ आहे.. राजसाहेबांनी भोंग्यांच्या त्रासाचा सामाजिक पैलू मांडला असून सर्वच धर्माच्या अनेक लोकांनी त्या भूमिकेचे स्वागत केले असून मुस्लिम धर्मातील सुशिक्षित लोकांनीही या मुद्द्याला सहमती दर्शवली आहे. तरीही काही राजकीय पक्ष व व्यक्तींकडून राजसाहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याला धार्मिक तेढीचा रंग दिला जात आहे. जर त्यावरुनही कोणाला फक्त जातीधर्माचे राजकारण करुन भोंगे हटवण्यात धार्मिक राजकारण आणायचे असेल तर मनसेचा नाईलाज आहे.
कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. सर्वच धर्मियांनी प्रार्थना शांतपणे घरात किंवा प्रार्थनास्थळात कराव्यात ही आमची मागणी आहे.
आमचे अनेक मुस्लिम धर्मिय मित्र आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मुस्लिम धर्मियां सोबत बसून अनेक धार्मिक वादग्रस्त विषय सामोपचाराने सोडवले आहेत.. त्या सर्वांनी सामंजस्यपूर्वक हा विषय हाताळावा व सिंधुदुर्ग आदर्श जिल्हा पॅटर्न इतर ठिकाणी द्यावा .. ३ मे ला महाआरती आयोजित केली असून प्रत्येकाने स्वतःहुन उत्स्फूर्त पणे या मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.
तिन तारिख नंतर या विषयी मार्ग न निघाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे धीरज परब शेवटी म्हणाले..
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_