कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

परजिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यांला नवोदय प्रवेश परीक्षेला वेंगुर्ले परीक्षाकेंद्रावर बसु देणार नाही .* *भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना घेऊन जन आंदोलन- प्रसन्ना देसाई* *🛑परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देणारया मुख्याध्यापकांवर कारवाई साठी शासनाचे लक्ष वेधनार.* *🛑परजिल्ह्यातील मुलांना हाॅलतीकीट मिळण्यास शिक्षण विभाग जबाबदार*

kokan Live Breaking News

*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 वेंगुर्ले दि २७एप्रिल :*
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात . मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील मुले वंचित रहातात .
गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे . या प्रकाराला शिक्षण विभागही जबाबदार आहे . कारण शिक्षण विभागातील परजिल्ह्यातील अधिकारी यांचे हितसंबंध असल्यामुळे तीकडील मुले फक्त परीक्षेसाठी आणुन , त्यांचा कागदोपत्री प्रवेश दाखवुन परीक्षेला बसवली जातात . ती मुले कोल्हापुरात असताना सुद्धा त्यांची याठिकाणी हजेरी दाखवली जाते , व शिक्षण विभाग त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते . त्यामुळे मुलांना परीक्षेसाठी हाॅलतीकीट मिळते .
गेल्या वर्षीही अशाच प्रकारे नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी घाटमाथ्यावरील विद्यार्थी बसले होते . त्यावेळी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आवाज उठवला होता व स्थानिक पालकांनी याबाबत आंदोलनाची भुमिका घेतली होती . त्यामुळे ह्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थी बसले नाहीत .
वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षण विभागाकडून माहिती घेतल्यावर असे निदर्शनास आले की , सन २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मधे परजिल्ह्यातील प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे *न्यु इंग्लिश स्कूल , मातोंड – २३ विद्यार्थी व शिवाजी हायस्कूल ,तुळस – १३ असे एकुण ३६ विद्यार्थी* हे थेट कोल्हापुरातुन ह्या दोन हायस्कूल मध्ये ५ वी मधे प्रवेशकर्ते झालेले आहेत .
*फक्त पाचवीतच प्रवेश का ?*
वेंगुर्ले तालुक्यामध्ये एकुण १४ हायस्कूल आहेत , परंतु सातत्याने तुळस व मातोंड हायस्कूल मध्येच थेट ५ वी मध्ये घाटमाथ्यावरील मुले प्रवेश घेतात यात गौडबंगाल आहे . याची उच्चस्तरीय चौकशी शिक्षण विभागाकडुन होणे आवश्यक आहे . कारण सदर विद्यार्थी हे पहीले ते चौथी पर्यंत चे शिक्षण आपल्या जिल्ह्यात घेतात व फक्त पाचवीत वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व मातोंड हायस्कूल मध्येच प्रवेश घेतात . त्यामुळे अशा प्रकारावर कारवाई व्हायलाच हवी.
*मुख्याध्यापकांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देऊ नये* —
फक्त नवोदय च्या प्रवेश परीक्षेसाठी पाचवीत प्रवेश घेतलेल्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी प्रवेश पत्र देऊ नये अशी मागणी भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे . तसेच अशाप्रकारे प्रवेशपत्र दिले तर भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना घेऊन त्या हायस्कूल मध्ये जाऊन आंदोलन केले जाईल व त्याची पुर्ण जबाबदारी त्या हायस्कूल वर असेल , असा इशारा भाजपा च्या वतीने देण्यात येत आहे .
तात्कालिन शिक्षण सभापती डाॅ. अनिषा दळवी यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश शिक्षण समितीच्या शेवटच्या बैठकीत दिले होते . त्यांनी खात्याअंतर्गत चौकशी केली असता , संपुर्ण जिल्ह्यात १०४ विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते . जिल्हा परिषदेकडुन राबविण्यात आलेल्या मोहीमेत अनेक शाळांमधून परजिल्ह्यातील विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळून आले होते . याबाबत शाळा व मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभापती डाॅ. अनिषा दळवी यांनी दिले होते .तसेच या परिस्थितीला संपुर्ण सिस्टीम जबाबदार असल्याचा घरचा आहेर शिक्षण विभागाला दिला होता .
*शिक्षक संघटनानी आवाज उठवीणे गरजेचे*
प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारया शिक्षक संघटनानी आपल्या जिल्ह्यातील मुलांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवीणे गरजेचे आहे .
३० एप्रिल ला होत असलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहे . भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना सोबत घेऊन परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन रोखले जाईल व त्याची पुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील , असा इशारा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने देण्यात आला आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई . तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर – रसीका मठकर – वृंदा मोर्डेकर , परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व साई भोई , ता.चिटणीस समीर चिंदरकर , बुथप्रमुख शेखर काणेकर उपस्थित होते. ..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!