नांदगाव येथे सौमित्र रिक्षा स्टँडच्या चालक-मालकांना मोरये पिता-पुत्रांकडून धमकी..
▪️त्यांच्यावर कारवाई करा; संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या कडे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२७: नांदगांव-तिठा येथे सन्मित्र रिक्षा संघटना नांदगांव यांचे रिक्षा स्टॅन्ड गेली ४० वर्षे आहे. या ठिकाणी नांदगाव, असलदे, तोंडवली-बावशी, ओटव व माईण, पियाळी या गावातील रिक्षा व्यावसायिक व्यवसाय करत आहोत. हे अधिकृत तीन रिक्षा स्टॅन्ड आहेत. तरी देखील स्टॅन्ड लगतच्या इमारतीचा मालक सुरेश उर्फ बाळा अर्जुन मोरये, मुलगा कमलेश सुरेश मोरये व सिध्देश सुरेश मोरये, (सर्व राहणार नांदगांव-तिठा, ता. कणकवली) हे तिघेही रिक्षा व्यावसायिकांना नेहमी शिवीगाळ, मारहाण करत तुमच्या रिक्षा इथे लावू नका असे सांगत धमकी देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या कडे केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना कार्याध्यक्ष सुरेंद्र कोदे, नांदगाव रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर, देवू डामरे, असलदे सरपंच पंढरी वायगणंकर, भाई मोरजकर, महामुद काझी, दिलीप डामरे, तैयब नावलेकर, अस्लम पाटणकर, संजय जेठे, जाफर कुणकेरकर, सुरेश मोरजकर, सुनील बोभाटे, सलीम नावलेकर, समशउद्दीन बटवाले, मंगेश बोभाटे, निलेश मोरये, मधुसूदन पोकळे आधी रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
अंगावर धावुन जात शिवीगाळ. दिलेल्या निवेदनात, सुरेश मोरये याने दुसऱ्या दिवशी तैयब नावलेकर यांच्या सायंकाळी ५ वा. अंगावर धावुन जात आई, बहिण, पत्नी वरुन शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. माझे कुटुंब दहशतीखाली आहेत. तसेच रिक्षा संघटना अध्यक्ष देवु जानु डामरे (रा.असलदे) यांना दिलांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी यांच्या अंगावर जात शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आहे. सर्वधर्मीय या रिक्षा स्टॅन्डवर ६०-७० रिक्षा नादगांव-तिठा येथे सर्व धर्मियांच्या एकोप्याने गेली ४० वर्षे व्यवसाय व सामाजिक उपक्रम करत आहेत. विनाकारण सुरेश मोरये व त्यांची मुले रिक्षा व्यावसायिकांना व नागरिकांना, व्यापारांना त्रास देत आहे. यापुर्वी संशयित सुरेश मोर्ये व त्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे. त्यामुळे व्यक्तींवर गुन्हे दाखल करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा नांदगांव-तिठा येथे आम्ही सर्वजण उपोषणास बसणार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच हे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देत कारवाईची मागणी केली आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

