कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

कनेडी प्रा.आ. केंद्र इमारतीच्या कामास विलंब होऊन अकरा महिन्यात केवळ पायाच बांधला..

▪️संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची शिवसेना पदाधिकार्‍यांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२७: जिल्हा परिषदेकडून बांधण्यात येत असलेल्या कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कामास विलंब झाला आहे. निविदा प्रक्रियेमध्ये दिलेली मुदत संपली असून अकरा महिन्यात केवळ इमारतीचा पाया बांधण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी मागणी त्या विभागातील शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ठेकेदारावर कारवाई न झाल्यास बांधकाम उपअभियंता कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर ८ मार्च २०१९ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे आदेश ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले असून गेल्या ११ महिन्यात केवळ इमारतीचा पाया बांधण्यात आला आहे. पायाचे बांधकाम केल्यानंतर काम बंद ठेवण्यात आल्याने पायासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी शिगा गंजून गेल्या आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे पूर्वीची इमारत कोसळून एकाच इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. जर नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर त्याचा वापर कोरोना कालावधीत अधिक झाला असता. ठेकेदाराने सध्या केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करत त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, केलेल्या कामाची तपासणी करून ते पूर्ण करून घ्यावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास सोमवार ९ नोव्हेंबर २०२० रोजी जि. प. बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले.

या संबंधिचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे यांनी उपअभियंता आर. पी. सुतार यांना दिले आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, गांधीनगर माजी सरपंच शेखर सावंत, भिरवंडे माजी उपसरपंच सुदर्शन सावंत, माजी ग्रा. पं. सदस्य मंगेश बोभाटे, मिलिंद बोभाटे, बुवा संतोष सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!