कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अवैध मार्गाने गोळा केलेल्या पैशाची धुंदी अखेर उतरली–तडीपार प्रस्ताव तयार

*🟥अवैध मार्गाने गोळा केलेल्या पैशाची धुंदी अखेर उतरली–तडीपार प्रस्ताव तयार*

*🟥पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची दमदार कामगिरी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:१२ एप्रिल*
सावंतवाडी शहरात श्री देव पाटेकरच्या पवित्र भूमीत जास्त काळ दादागिरी, पैशाची मुजोरी,टिकत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, तरीही पैशाचा माज करणारे करोडपती रोडपती झालेले आम्ही याची डोळा पाहिले आहे, त्यामुळे सावंतवाडी शहरात जो लिनतेने वागला तो पुढे गेला, व ज्याने अंती केली तो संपला हा इतिहास आहे, त्यामुळे गोव्यातून चोरट्या मार्गाने अवैद्य दारू सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात पोहचवणारे दारु तस्कर मालामाल होऊन सावंतवाडी शहरावर राज्य करण्याचा प्रयत्न करत असतील तो त्यांचा प्रयत्न श्री देव पाटेकर व उपरलकर कधीही यशस्वी होऊ देणार नाही
याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.
म्हणूनच अशा प्रवृत्तीविरुद्ध आम्ही सडेतोड लिखाण केले व करत आहोत,जर सावंतवाडी शहरात नाक्यानाक्यावर उभे राहून काल सकाळची शेंबडी पोरे अवैध मार्गाने मिळालेल्या पैशाच्या जोरावर दहशत निर्माण करत असतील तर त्यांना वठणीवर आणणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,मॅगो टू च्या समोर घोळका करून दोन गट एकमेकांना भिडत असताना त्याठीकाणी पोसचलेल्या पोलिसालाच कोण दादागिरी करत असले तर कायद्याचा धाक कोणाला? फक्त सर्व सामान्य माणसाला,याची चीड आम्हाला आली म्हणूनच या विरुद्ध आम्ही सडेतोड लिहीले, त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी पोलिसांना संबंधित आरोपींविरुद्ध सर्व गुन्ह्यांची माहिती गोळा करुन तडीपार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत व तसे प्रस्ताव तयारही झालेत.
आपल्याला आपण केलेली प्रकरणे भोवणार हे लक्षात येताच अशा प्रकारचे लिखाण करण्यात येऊ नये यासाठी वेगवेगळ्या माणसांकरवी विनंती करण्याचे काम सुरू झाले ,मात्र या प्रवृत्तीचा पूर्णपणे बिमोड होत नाही तोपर्यंत कोणी कितीही विनवण्या केल्या तरी आमचा लढा आम्ही सोडणार नाही, दारूतून मिळालेल्या अवैद्य पैशाच्या जीवावर सावंतवाडी शहरात नाक्या नाक्यावर थांबून आपली दहशत निर्माण करणाऱ्यांच बंदोबस्त झालाच पाहिजे, पैशाची मस्ती उतरली पाहिजे,हा एकच प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत.
एखाद्या व्यक्ती कडे अक्कले पेक्षा जास्त व कुवतीच्या बाहेर पैसा आला की त्याच्या डोक्यात सैतानाचा वावर सुरू होतो, व असे सैतान अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांनाही बरबाद करतात, त्यामुळे वृक्षाच्या मुळाशी घातला तर फांद्या आपोआप खाली येतील एक एक फांदी तोडायची गरच नाही हे पक्के करून आम्ही याच्या मुळाशी पोहोचण्याचे ठरविले, मात्र बरबटलेली यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभाग, व ते आमचे काम नाही असे सांगून हात झटकणारे सिंधुदुर्ग पोलीस यांना कुंभकर्णाच्या झोपेतून जागे करण्याचे अशक्यप्राय असे काम आम्हाला करावे लागले व ते जागे झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात सुमारे पंधरा कोटीची अवैद्य दारू जप्त करण्यात आली आज पर्यंतच्या रेकॉर्ड मधील ही रेकॉर्डब्रेक कारवाई आहे ,विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर भरारी पथकाचे संजय साळुंखे यांनी चमकदार कामगिरी केली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांना चाप बसला.
आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय, त्या दारू धंद्यामुळे युवा पिढी बरबाद होताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत होते, सावंतवाडी शहरातील अनेकांच्या बारमध्ये विषारी दारू पिऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत व त्या पैशाचे जीवावर काही व्यक्ती राजकारण करून मी सगळ्यांना पुरून उरेल अशी दर्पोक्ती करत आहे, हा पैशाचा माज आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी उतरूच याची तुम्हाला खात्री देतो, मात्र सावंतवाडी शहरात राजरोसपणे अवैध धंदा करणारी टोळकी फिरून दहशत निर्माण करतात ती मात्र नाक्यानाक्यावर गायब झाली आहेत, पोलिसांची हा दरारा कायम राहिला तर पोलिसांच्या अंगावर जाण्याचं धाडस भविष्यात कोन करणार नाही, यासाठी राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी निपक्ष पणे काम केले पाहिजे अशा लोकांसाठी एखाद्या राजकीय व्यक्तीने फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवरायांच्या महाराष्ट्रात चुकीचे काम करणार नाही असे सांगण्याचे धाडस संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे,
दारु माफियांची सावंतवाडी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढणे सावंतवाडी पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे ,या या शहराला शैक्षणिक ,सांस्कृतिक, सामाजिक, वारसा आहे,या शहरात विचारांची लढाई विचारांने लढली जाते, त्यामुळे अशा प्रकारचे राडे, दहशत, सावंतवाडी शहराने कधी पाहिली नाही ती पाहवी लागत आहे, गांजा चरस, दारू, विकणारे कोण कोण आहेत याबाबतची सर्व माहिती गेली अनेक वर्ष सावंतवाडीत ठाण मांडून असणाऱ्या पोलिसांना आहेच, त्यामुळे त्यांची वेगळी माहिती देण्याची गरज नाही ,त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत असे आमचे मत आहे.
या सर्व गोष्टींचा उहापोह कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने आपल्या संपादकीय सदरात करताच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष प्रामाणिक पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना केल्या, अशा प्रकारचे कृत्य पैशाच्या जीवावर कोन करत असेल तर त्याच्यावर त्वरित लगाम घालावी,सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक शंकर कोरे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर असताना एके ठिकाणी अघटित घटना घडली, जुगाराच्या अड्ड्यावर मारामारी झाली, मात्र याची कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाकडे नव्हती, रजेवरून असलेले पोलीस निरीक्षक शंकर कोरे हजर झाले त्यावेळी याबाबतची सर्व माहिती गोळा करून त्यांनी संबंधितांना अशा प्रकारचे कृत्य गावात करू नये अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड दमही भरला, त्यामुळे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचेही अभिनंद.
सावंतवाडी शहरात संध्याकाळी सहानंतर तळ्याकाठी सावंतवाडी पोलिसांनी फेरफटका मारावा, तळ्याकाठी चालणारी संघटित गुन्हेगारी कायमस्वरूपी संपुष्टात होईल असे..

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!