कणकवलीमनोरंजनसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य चळवळीचे नव्याने सीमोल्लंघन करू. मात्र, साहित्यिकांनी सहकार्य करावे..

▪️कवी लेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांचे प्रतिपादन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२७: सिंधुदुर्गातील नवोदित लेखक कवींसाठी निष्ठेने साहित्य उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य चळवळीचे नव्याने सीमोल्लंघन करू. मात्र, यासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा कवी लेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांनी येथे केले.

कवी लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तसेच विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्रात कवी लेखक संघटना स्थापन झाली असून त्याची सिंधुदुर्ग शाखा नुकतीच सुरु करण्यात आली.या शाखेची पहिली बैठक येथे श्री मातोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी संघटनेच्या माध्यमातून फार गाजावाजा न करता गंभीरपणे साहित्यिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाहीही श्री मातोंडकर यांनी दिली. यावेळी संघटनेच्या सचिव सरिता पवार, कोषाध्यक्ष किशोर वालावलकर, उपाध्यक्ष प्रा मनीषा पाटील, जिल्हा संघटक सुर्यकांत चव्हाण, सहसचिव प्रणिता तांबे आदी उपस्थित होते.

श्री. मातोंडकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आधीपासूनच विविध साहित्य संस्थांच्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे. आपण स्वतः काही संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहोत. आता कवी लेखक संघटना नव्याने सुरू झाली असून जिल्हा स्तरावर या संस्थेचे काम चालेल.पण हे काम करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी लेखकांना प्रेरणा देताना महाराष्ट्र स्तरावर या कामाची नोंद घेतली जाईल असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचाच एक पहिला भाग म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि विख्यात मराठी कवी, कामगार चळवळीचे पाठीराखे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने महाराष्ट्र स्तरावर एक काव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेतील विजेत्या कवीला पाच हजाराचे बक्षीस देऊ गौरविण्यात येणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सरिता पवार, किशोर वालावलकर, प्रा.मनीषा पाटील, सुर्यकांत चव्हाण, प्रणिता तांबे यांनी सहभाग घेतला तसेच कवी लेखक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री ​मातोंडकर यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ग्रंथ भेट आणि शाल देऊन सत्कारही करण्यात आला.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!