कणकवलीराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

परतीच्या पावसाच्या तडाख्याने सडलेल्या भातशेतीची पहाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून करावी..

▪️हवालदिल शेतकऱ्यांचे अश्रू मुख्यमंत्र्यांनी पुसावेत; जनता दलाचे नेते प्रभाकर नारकर यांची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली,दि.२७: परतीच्या पावसाच्या तडाखा साऱ्या कोकणपट्टीला बसला असून तयार झालेले भात पीक जाग्यावर सडताना बघायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः येऊन पाहणी करावी आणि हवालदिल शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी जनता दलाचे नेते प्रभाकर नारकर यांनी केली आहे.

याबाबत पक्षाच्या वतीने  केलेल्या मागणीत म्हटले आहे की, कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. किंबहुना त्याचा त्याग, त्याने गाळलेला घाम आणि प्रसंगी सांडलेले रक्त यावरच शिवसेना उभी राहिली. पण सत्ता मिळाल्यानंतर याच कोकणी माणसाकडे आपल्या सरकारकडून दुर्लक्ष होत आहे, असे जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, मतीन खान, संजीवकुमार सदानंद तसेच कोकण जन विकास समितीचे जगदिश नलावडे, सुरेश रासम, प्रकाश लवेकर​, ​धनाजी सुरोसे, विजय लाड यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लाॅकडाऊन जारी झाल्यानंतर, राज्य सरकारने परप्रांतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. मात्र, मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावाकडे परतण्यासाठी साधी एसटीची सोय होऊ शकली नव्हती. कोरोनामुळे दर घसरल्याने सरकारने दुध उत्पादक शेतकरी, कापूस, मका, कांदा  पिकविणारे यांना मदतीचा हात दिला मात्र, काजू बियांचे दर निम्म्यावर आले असतानाही सरकारला कोकणातील शेतकऱ्यांना मदत करावी, असे वाटले नाही.

त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्हा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली हे तालुके  उद्ध्वस्त झाले. आपल्या सरकारने निकष बदलून जादा मदत देण्याच्या घोषणा केल्या. परंतु त्या हवेतल्या ठरल्या आहेत. घरांच्या झालेल्या नुकसानीची थोडीबहुत भरपाई सरकारने केली. परंतु आंबा, नारळी-फोपळीच्या बागा यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, एक पैशाची मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा आरोप या सर्वांनी केला आहे.

आता परतीच्या पावसाचा तडाखा साऱ्या राज्याला बसला तसाच तो संपूर्ण कोकणपट्टीला बसला आहे.  तयार झालेले उभे भात पीक जाग्यावर सडत आहे. अजूनही पाऊस सुरू आहे आणि शेतकरी हवालदिल आहे. अशा काळात आपण अश्रू पुसायला धावून याल, अशी कोकणी माणसाची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मतदारांसाठी नेहमीच्याच सजगतेने पश्चिम महाराष्ट्रात धावले. टीका झाल्यावर आपणही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात धावून गेलात. कोकणात नेहमीप्रमाणेच उदय सामंत येऊन गेले, पण त्यांच्या शब्दांना मंत्रिमंडळात  वजन किती, हा प्रश्नच आहे.

आपण, १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यातील नुकसानभरपाईची रक्कम अर्धीही नाही. यातील कोकणाच्या वाट्याला नेमके काय येणार आहे, हा प्रश्नच आहे.

या पार्श्वभूमीवर आपण स्वतः कोकणात उतरून, शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेणे आवश्यक आहे. तरच कोकणात काही मदत मिळू शकेल. कोकणच्या जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिली आहे. पण याचा अर्थ तिला आपण गृहीत धरावे असा होत नाही.

त्यामुळे महोदय, परतीच्या पावसाने झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या दैनावस्थेची आपण स्वतः पाहणी करावी, आणि कोकणातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी,  कोकणात संपूर्ण वर्षात भाताचे एक पीक घेतले जाते. दुसऱ्या पिकासाठी सरकारने पाण्याची सोय केलेली नाही, हे लक्षात घेऊन हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे, तसेच निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या बागायतदारांची जाहीर झालेली मदत कुठे अडकली, त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी या सर्वांनी केली आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!