कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घेतली कोकण लाईव्ह च्या वृत्ताची दखल

*🟥 पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घेतली कोकण लाईव्ह च्या वृत्ताची दखल*

*🟥 ओरोस हून डी वाय एस पी कांबळे यांना पाठवले सावंतवाडीत*

*🟥 सावंतवाडी शहरात नाक्यावर थांबून दहशत माजविणाऱ्या दारु माफीयांना पोलिस स्थानकात बोलावून दिली तंबी*

*🟥तडीपार ची यादी तयार,सुरवातीला तीन तर नंतर तीन असे सहा जण होणार तडीपार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:८ एप्रिल*
सावंतवाडी संस्थानला महात्मा गांधी यांनी राम राज्य असे म्हटले होते, त्यावेळी बापूसाहेब महाराज सावंतवाडी संस्थान चा कारभार चालवत होते ,प्रजेला न्याय देणारा राजा असा त्यांचा लौकिक होता, या सावंतवाडी शहराला खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा आणली संस्थांनीच, सावंतवाडी शहर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते, या शहरात विचारांची लढाई ही विचाराने लढली जायची, कधी या शहराने राडे पाहिले नाहीत मात्र अलीकडच्या सात आठ वर्षात गोव्यातून अवैध मार्गाने दारू सिंधुदुर्गात येऊ लागल्याने व ती दारू स्वस्त मिळत असल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक युवक या धंद्यात उतरले व काही महिन्यातच ते मालामाल झालेत.
कुवती पेक्षा जास्त पैसा मिळाला की डोक्यात सैतान शिरतो असे म्हटले जाते तेच या युवकांचे झाले, या पैशाच्या जीवावर मौज ,मस्ती ,दंगा, असे प्रकार घडू लागले,त्यात कहर म्हणजे एका ५० वर्षीय महिले सोबत शैय्या सोबत करायला याच धंद्यातील दारू माफिया गेले त्यांच वय १६,१७,१९,२० होते, ती महिला ज्या गाडीत त्यांच्या सोबत शैय्यासोबत करत होती त्यातच ती गुदमरून मृत्यू पावली ,त्यानंतर या युवकांनी तिला नेऊन आंबोलीच्या घाटात टाकले. म्हणजे पैशाच्या जीवावर काय ही विकृती, जी महिला आपल्या आईच्या वयाची होती अशा महिले सोबत पैशाच्या जीवावर हे युवक शय्यासोबत करायला गेले, त्यावेळेस आम्ही ठरवले की या दारू धंद्या विरोधात लढा उभा करायलाच पाहिजे, कोण करणार? यापेक्षा आपण केला पाहिजे असे ठरवून आम्ही या विरोधात लिहायला सुरुवात केली ,पहिल्यांदा काही जण मांडवली साठी आलेत ,आम्ही त्यावेळी त्यांना स्पष्ट सांगितले माझ्या वाड्यातील असेच चार-पाच युवक ऐन तारुण्यात दारूच्या व्यसनापायी मरण पावले त्यांचे मृतात्मे परत आणून द्या मी लिहायचे बंद करतो, त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की पुन्हा असली गोष्ट घेऊन माझ्याकडे यायचे नाही, मी पोलिसांना बोलवून तक्रार देऊन तुम्हाला त्यांच्या ताब्यात देईन ,त्या दिवसापासून आजतागायत त्या दारू माफीयांनी कधी डोळे वर करून माझ्याकडे पाहिले नाही.
त्यापैकी बरेच जण मला ओळखतात पण माझ्याशी बोलण्याची धारिष्ट करत नाहीत, माझी त्यांची वैयक्तिक दुश्मनी काही नाही, मात्र त्यांचा मार्ग चुकीचा असल्यामुळे माझा विरोध कायम आहे, हे युवक अवैद्य मार्गातून मिळालेल्या पैशामुळे चुकीच्या मार्गाला लागतात,नाक्या -नाक्यावर थांबून अर्वाच्च भाषेत बोली चाली करणे ,एकमेकांना हाका मारणे, कॉलेजच्या युवतींना बघून शेर शायरी करणे, असे प्रकार वाढीस लागले, मी अनेक वेळा याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली, तळ्याच्या काठी बिअर च्या बॉटल ला पेपर गुंडाळून संध्याकाळच्या वेळेस ती बियर पिणारे ही आम्ही अनेक जण पाहिले, त्यावेळी ही संस्कृती सावंतवाडीत नको म्हणून पोलीस ठाण्यात फोन लावून त्या युवकांना हुसकावून लावण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र आज सावंतवाडी शहरातल्या अनेक ठिकाणच्या व वस्त्यांमध्ये एकांतात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे आणि शरमेची बाब म्हणजे त्या ठिकाणी कॉलेजच्या युवती त्यांच्याबरोबर येतात ,त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसला पाहिजे ही एकच आमची प्रामाणिक मागणी आहे.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय, आपली देशाची भावी पिढी कुढच्या दिशेने चालली ती कोणाचे अनुकरण करते याबाबततचे चित्र अंधुक दिसत असल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागत आहे.
आमची सततची एकच मागणी होती की एकाच गुन्ह्यात पुन्हा- पुन्हा अटक झालेल्या संशयीत आरोपीवर तडीपारीची कारवाई करावी व तशी कायद्यात तरतूद आहे, तसे झाल्यास बर्‍याच प्रमाणात याला आळा बसेल म्हणून आम्ही त्यादृष्टीने लिखाण केले होते.
कायद्यात पळवाटा असल्यामुळे असे प्रस्ताव संबंधित न्यायदंडाधिकारी कडे गेल्यावर राजकीय वशिला, पैशांचा वापर, करून कायद्यातील पळवाटा शोधून हे बाहेरही पडतील हे जरी खरे असले तरी अशा प्रकारची कारवाई होऊ शकते याची भीती त्यांना राहील हे तेवढेच खरे आहे.
दोन चार दिवसापूर्वी तळ्या काठी मॅंगो टू हॉटेल समोर मोठा जमाव होता, दोन गटांमध्ये वाद सुरू होता, त्यावेळी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार त्या ठिकाणाहून जात होते त्यांनी त्या युवकांना हटकले तर त्या युवकांनी त्या पोलिसांशी हुज्जत घातली, तुम्ही आमचे काय ते करून घ्या हे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली, ही एवढी गुर्मी कशी व कशामुळे तर झटपट मिळालेल्या पैशामुळे असे आमचे स्पष्ट मत आहे. व पोलिसही त्यांचे मित्र असल्यामुळे पोलीस यंत्रणा आपल्या खिशात आहेत असे ते वागतात, या मध्ये प्रामाणिक पोलिसांचा बळी जातो. त्यामुळे नाक्या नाक्यावर राहून अशी कोण दादागिरी करत असेल तर त्याला कायद्याचा जरब बसलाच पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कठोर पावले उचलत डी वाय,एस पी कांबळे यांना तातडीने सावंतवाडी शहरात पाठवले ,शहरात नाक्यावर थांबून अशी दहशत निर्माण करणाऱ्या युवकांना पोलीस ठाण्यात नेऊन तंबीच दिली, असे प्रकार पुन्हा घडल्यास कायदा काय असतो हे दाखवून देऊ असे खडे बोलही त्यांनी सुनावले, एवढ्यावरच न थांबता जे युवक अवैध दारू धंद्यात आहेत त्यांच्यावर कोण-कोणत्या भागात गुन्हे दाखल आहेत व कोण कोणत्या कलमाखाली याची माहिती घेऊन त्यांचे तडीपार चे प्रस्तावित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले, त्यामुळे सर्वप्रथम अशा प्रामाणिक पोलीस अधीक्षकांचे मी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या परिवारातर्फे जाहीर अभिनंदन करतो, सावंतवाडी शहरातील शांतता व संस्कृती कायम टिकून राहायची असेल तर अशा गुंड प्रवृतीचा बिमोड झालाच पाहिजे असे आमचे मत आहे ,मग गुंडगिरी करणारे ते युवक कोण आहे ,याच्याशी आमचे देणेघेणे नाही जोपर्यंत अशी प्रवृत्ती शहरातील नष्ट होत नाही तोपर्यंत आमचा लढा आम्ही कायमच सुरू ठेवणार आहोत, व त्यासाठी पाटेकर व रक्षण करता उपरलकर आम्हाला बळ देईल याची खात्री आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

_______________________
*बंपर ऑफर.. 💥बंपर ऑफर..💥 बंपर ऑफर..*

💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️

🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*

*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃

🏫🏃🏻‍♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻‍♀️🏫

👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]

*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*

👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*

👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )

👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️

🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*

📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!