कोकण

शिरोडा येथे उभारतेय जिल्ह्यातील पहिले धर्मादाय न्यूरो क्लिनिक

*शिरोडा येथे उभारतेय जिल्ह्यातील पहिले धर्मादाय न्यूरो क्लिनिक*

 

सिंधुदुर्ग, दि.०८: : सद्गुरु बालदत्तनाथ मेमोरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, आरवली, सोनसुरे, शिरोडा, सिंधुदुर्ग, न्यूरो हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सोनसुरे, शिरोडा येथे जिल्ह्यातील पहिले नियमित धर्मादाय न्यूरो क्लिनिक उभारत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे 756 गावांना होणार असून फाउंडेशनच्या या उपक्रमाचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले.

अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 7 एप्रिल 2022) न्यूरो हेल्थ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मंत्रालय, मुबंई येथे भेट घेऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भारतातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. मोहनीश भटजीवाले, श्री. सुधीर प्रभुदेसाई, श्री. नितीन जाधव, श्री. किशोर महाले, श्री. अश्विन चिकणे, अर्चना जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

न्यूरो फाउंडेशनला दिलेल्या पत्रात मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, ‘सोनसुरे, शिरोडा, जि. सिंधुदुर्ग येथील प्रस्तावित धर्मादाय रुग्णालयाचा तुमचा डीपीआर पाहिला आहे. जिल्ह्यातील सुमारे 756 गावांच्या फायद्यासाठी पहिले नियमित धर्मादाय न्यूरो क्लिनिक सुरू केल्याबद्दल मी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करतो.’ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध हाव्यात, यादृष्टीने फाउंडेशनच्या माध्यमातून शिरोडा येथे उभारण्यात येत असलेल्या धर्मादाय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या प्रकल्पाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘इन्स्टिटयूट ऑफ न्यूरोसायन्सेस हे या प्रकल्पामधील एक प्रमुख वैशिष्ट्य असून अशा अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या हितासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विविध शासकीय आरोग्य योजना तुमच्या धर्मादाय रुग्णालयात राबविण्यास आम्हाला आनंद होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!