Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोती तलावाच्या संवर्धनासाठी राजघराण्याने घेतलेली भूमिका स्वागतार्ह…

🟥मोती तलावाच्या संवर्धनासाठी राजघराण्याने घेतलेली भूमिका स्वागतार्ह…

🟥अँड.परिमल नाईक; आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी…

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी ता.०७: मोती तलावाच्या संवर्धनासाठी सावंतवाडीच्या राजघराण्याने घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. आता युवराजेंनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अडलेले घोडे सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती अ‍ॅड. परिमल नाईक यांनी केले आहे. दरम्यान राणी जानकीबाई सुतिकागृहाच्या माध्यमातून या आधीच राजघराण्याने मोठे योगदान दिले आहे. त्याच प्रमाणे आता सावंतवाडी शहरात वैद्यकीय दालन उभे राहण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, शासनाने सुध्दा त्यांचे नुकसान होवू नये, यासाठी योग्य तो सुवर्णमध्य काढावा, असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
श्री. नाईक यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले. त्यात असे म्हटले आहे की, सावंतवाडी शहराला पर्यटन दृष्ट्या महत्वाचा ठरणार्‍या मोती तलावाच्या विकासासाठी राजघराण्याने सकारात्मक भूमिका घेतली हे ऐकुन खुप आनंद व समाधान वाटले. मी आरोग्य सभापती असताना याबाबतचा निर्णय घेतला होता व त्या दृष्टीने सकारात्मक पाऊले सुद्धा उचलली होती परंतु दुर्दैवाने कोरोना संकटाच्या आघाताने पुढील कारवाई वेळीच करता आली नाही याची खंत आहे परंतू आता खुद्द राजघराण्यानेच सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे न्यायालयीन वादासहित सर्व प्रश्न सोयीस्कर रित्या सुटू शकतील. ही भूमिका घेणार्‍या युवराज लखमराजेंचे मी व्यक्तिशः आभार मानतो. आता त्यांनी रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुद्धा तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावा. आणि शासनाने ही त्यांची जमिन घेताना त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

———————————————
*____🥘__हॉटेल तिखट मिठ__🥪____*
*चहा नाश्त्याची उत्तम सोय*

🥘साऊथ इंडियन
● इडली सांबार
● मेदूवडा सांबार
● मसाला डोसा
● प्लेन डोसा
● पेपर मसाला डोसा
● बटर डोसा
● चीज बटर डोसा
● शेजवान डोसा
● छोले भटूरे
◆ चहा
◆ कॉफी
◆ ग्रीन टी
◆ लेमन टी
◆ शिरा
◆ उप्पीट
◆ भाजी पुरी
◆ कुर्मा पुरी
◆ भाजी पाव
◆ आंबोळी चटणी
◆ आंबोळी उसळ
◆ मिसळ पाव
◆ मिसळ पुरी
◆ तवा पाव भाजी
◆ कुर्मापुरी
◆ कुर्मा पाव
◆ झुणका भाकरी / ठेचा
*गौरव रमाकांत तुळसकर*
*📲8805425156*

*पत्ता :* आदिनारायण मंगल कार्यालय समोर,
मेनरोड, सालईवाडा,सावंतवाडी
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!