कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

विझलो आज जरी मी’ पासून ‘बाप राबतो आयुष्यभर’ कवितेपर्यंत रंगले सुंदरवाडी काव्य संमेलन

*विझलो आज जरी मी’ पासून ‘बाप राबतो आयुष्यभर’ कवितेपर्यंत रंगले सुंदरवाडी काव्य संमेलन*

*सामाजिक बांधिलकीचे आयोजन. पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा विशेष सत्कार*¿

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग-,१३*
शहरातील मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्यावर कवी केशवसुत यांच्या १५६ व्या जयंती निमित्ताने शहरातील सामाजिक बांधिलकी या सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘सुंदरवाडी कवीसंमेलन’ आयोजित करण्यात आले होते. कवी संमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, साहित्यिक प्रभाकर भागवत, सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, प्रा.शैलेश नाईक, प्रा.सतीश बागवे, ॲड. अशोक पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. बऱ्याच कालावधीनंतर सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठी काव्य मैफिल रंगली होती. थोर साहित्यिक व आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून काव्य संमेलनाला सुरुवात झाली. प्रारंभीच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कवी सुरेश भट यांच्या “विझलो जरी आज मी, तरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही”, ही कविता सादर करून सुंदरवाडी कविसंमेलनाला वेगळीच रंगत आणली. मात्र आपण सादर केलेल्या कवितेचा वेगळा अर्थ जोडून कृपया कोणीही त्याचा राजकीय विपर्यास करू नये, असेही विधान त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी गझलकार विश्वास यांची “कोई दीवाना कहता है, कोई पागल समजता है, धरती की बेचैनी को बस, बादल समजता है..!” ही गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर संमेलनात उपस्थित असलेले बालकवी पासून नवोदित कवी, युवा कवी व ज्येष्ठ कवीपर्यंत उत्तरोत्तर काव्य मैफल रंगत गेली. यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा यांनी “आता कविता करण्याचे दिवस आहेत काय..?” असे सांगत आपल्या कवितेतून कवींना अंतर्मुख केले. त्यानंतर ज्येष्ठ कवयित्री उषा परब, मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा.रुपेश पाटील, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, विठ्ठल कदम, किशोर वालावलकर, मनोहर परब, सीताराम गावडे, भूषण आरोसकर, मंगल नाईक-जोशी, वाय.पी.नाईक, विनायक गांवस, ऋतुजा सावंत-भोसले, प्रकाश तेंडोलकर, मृण्मयी पोकळे, स्वप्ना गोवेकर, प्रा.ॲड.अरुण पणदुरकर, प्रज्ञा मातोंडकर, बी.जी.बोर्डे, सौम्या गोवेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कवितेतून सुंदरवाडी कविसंमेलनात रंग भरले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.शैलेश नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सामाजिक बांधिलकीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.
*पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा विशेष सत्कार* ‘सुंदरवाडी कवी संमेलन’ सुरू होण्यापूर्वी सामाजिक बांधिलकी संस्थेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले पत्रकार अभिमन्यू लोंढे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्यानं सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सामाजिक बांधिलकी संस्थेकडून पत्रकार लोंढे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सावंतवाडीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी,डॉ. मधुकर घारपुरे, प्रा.केदार म्हसकर, प्रदीप ढोरे, सुधीर धुमे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, पत्रकार राजेश मोंडकर, प्रा. तुषार वेंगुर्लेकर, इफ्तेकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस,अर्षद बेग, पत्रकार हरिश्चंद्र पवार,उमेश सावंत, अमोल टेमकर, साबाजी परब, शुभम धुरी, रोहन गावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होत
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!