कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कॅनरा बॅंक सावंतवाडीच्या वतीने मळगांव येथील महिलां सहीत पुरुष व युवक -युवती यांच्यासाठी शुन्य बॅलन्स खाते उघडण्याचा कार्यक्रम संपन्न

🛑कॅनरा बॅंक सावंतवाडीच्यावतीने मळगांव येथील महिलां सहीत पुरुष व युवक -युवती यांच्यासाठी शुन्य बॅलन्स खाते उघडण्याचा कार्यक्रम संपन्न

🛑शंभराहून अधिक महिलांनी घेतला उत्स्फूर्त लाभ

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻प्रतिनिधी-सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,१५ : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान योजनांतर्गत देण्यात येणारे लाभ लाभार्थ्यांना मिळावेत या उद्देशाने कॅनरा बॅंक सावंतवाडीच्यावतीने मळगांव येथील महिलांसहीत पुरुष व युवक -युवती यांच्यासाठी शुन्य बॅलन्स खाते उघडण्याचा कार्यक्रम सोमवारी मळगांव ग्रामपंचायत मळगांव येथे पार पडला. या कार्यक्रमात मळगांव मधील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त लाभ घेतला.
या कार्यक्रमात कॅनरा बॅंक सावंतवाडीचे व्यवस्थापक( मॅनेजर) रजनीश वर्मा, वरिष्ठ लिपिक विशाल देसाई,बॅंक कर्मचारी विनोद मोरजकर,संदीप सामंत, प्राची गवस, उमेद बचत गटाच्या मानसी परब, मळगांव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या निकिता बुगडे, माजी सदस्य गजानन सातार्डेकर, गुरुनाथ गावकर तसेच मळगांव मधील महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांना व पुरुष व युवक -युवती यांना
शुन्य बॅलन्स खाते उघडण्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी मळगांव मधील 100 हून अधिक महिलांनी व पुरुष व युवक -युवती यांनी लाभ घेतला.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत वय वर्ष 18 ते 70 वर्षापर्यंतच्या ग्राहकांचा दोन लाख रुपये विमा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार आहे. यासाठी वर्षाचा 12 रुपये हप्ता (प्रिमियम) भरावा लागणार आहे. तर जीवन ज्योती सुरक्षा विमा योजनेत अंतर्गत वय वर्षे 18 ते 50 वर्षापर्यंतच्या ग्राहकांना दोन लाख रुपये पर्यंत चा विमा ग्राहकाचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार आहे. यासाठी वर्षाचा रुपये 330 इतका हप्ता भरावा लागणार आहे. या प्रमाणेच केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजने अंतर्गत लय वर्षे 18 ते 40 वर्षे या वयोगटातील ग्राहकांना त्यांच्या वयानुसार आणि पेन्शन प्रमाणे ( रुपये 1 हजार ते 5 हजार) पर्यंत हप्ता (प्रिमियम) बसणार आहे. हा हप्ता भरणाऱ्या ग्राहकांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या ग्राहकांना प्रति महिना 1 हजार ते 5 हजार पेन्शन मिळणार आहे.या योजनांचा लाभ मळगांव मधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!