भविष्यात आरोग्य संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण होतानाच आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनेल- खासदार विनायक राऊत
*🛑भविष्यात आरोग्य संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण होतानाच आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनेल- खासदार विनायक राऊत*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🔹सिंधुदुर्ग,४ मार्च*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांना दिलेला शब्द प्रत्यक्षात साकारत आहे. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे भविष्यात आरोग्य संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण होतानाच आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून प्रयत्न करणारी टिम आणि ते कसे होणार नाही असे प्रयत्न करणारे या निमित्ताने समोर आले.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने कृतज्ञता सोहळा आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. खासदार विनायक राऊत यांचा समितीचे समन्वयक अँड. शामराव सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विकास सावंत, अँड शामराव सावंत, सीए लक्ष्मण नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रवीण भोसले, विकास सावंत तसेच कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, समन्वयक शामराव सावंत आदींचा सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. ते या कार्यक्रमात उपस्थित नव्हते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, जिल्हावासीयांना कायमच राजकारणामुळे बळी पडावे लागत आहे. राज्यातील अन्य भागांमध्ये विकासामध्ये राजकारण नसते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणचे असल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी दिलेले योगदान हे फारच महत्त्वाचे आहे. शासकीय महाविद्यालयाची घोषणा करून ते थांबले नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय तसेच रुग्णालयाच्या जवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभूत सुविधा देणारी इमारत उभी करण्यासाठी मंजुरी दिली तसेच वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी वसतिगृह, शासकीय महाविद्यालयासाठी येणारे अडथळे देखील दूर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली राजकीयदृष्ट्या अडथळे येत असले तरी त्यांनी घेतलेली मेहनत ही फारच मौल्यवान होती असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै , प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांचे संसदेतील आदर्श हे प्रेरणादायी आहे त्यांचा आदर्श घेऊनच मी काम करत आहे जरूर त्या वेळी सुरेश प्रभू देखील यांचे मार्गदर्शन घेत आहे. नाथ पै, दंडवते यांचे योगदान हे फारच मौल्यवान आहे आतापर्यंत घोषणा व्हायच्या निवेदने दिली जायची कोरडे आश्वासन दिले जायचे मात्र फॉरमॅटमध्ये काम केले आणि पाठपुरावा केला तर काम होते हे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उदाहरण ठरेल असे त्यांनी सांगून सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा यासाठी पाठपुरावा देखील फारच महत्त्वाचा ठरला असे ते म्हणाले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ आणि माणगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहीम या आठवणी सविस्तर पण संधी मिळाली तर सांगता येतील.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय सेवेसाठी उपयुक्त ठरणार असून आर्थिक सक्षमतेसाठी उपयोगी ठरतील. संसदेत १२ मिनिटांत पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री यांचे लक्ष वेधत भाषण केले त्याचा फायदा मंजूरीसाठी झाला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यानंतर यश मिळते त्याचे प्रतिक म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर लोकांना कमीत कमी खर्चात वैद्यकीय सेवा देखील मिळेल. यावेळी आमदार दिपक केसरकर म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून राजकीय प्रयत्न केले गेले मात्र या मोहिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत पुरून उरले त्यांनी खऱ्या अर्थाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून उत्तर दिले आता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न केला जाईल.
आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द दिला होता तो आता पूर्ण होत आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक अँड शामराव सावंत यांनी शासकीय महाविद्यालय मंजुरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना २५ हजार पोस्टकार्ड, विविध संस्थांचे ठराव पाठविले तसेच शासकीय महाविद्यालय व्हावे म्हणून पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री यांना देखील मेल पाठवले असे सांगताना यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन खासदार विनायक राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी करण्यासाठी घेतलेली मेहनत ही फारच मौल्यवान आहे. प्रा. मधु दंडवते यांनी रेल्वे आणण्यासाठी आणि खासदार विनायक राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी केलेले प्रयत्न हे मोठे यशाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अण्णा केसरकर, रूची राऊत, डॉ. राजेश नवांगुळ, संजय पडते, नागेंद्र परब, रुपेश राऊळ, अन्नपूर्णा कोरगावकर, मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी, दीपक गावकर, विनय वाडकर, प्रतीक बांदेकर, सुजित लोंढे, डॉ संजीव लिंगवत, पुंडलिक दळवी, नारायण राणे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी महिला बचत गट आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

