पर्यटकांना घेऊन जाणारी बस धामापूर येथे पलटी
🛑पर्यटकांना घेऊन जाणारी बस धामापूर येथे पलटी
🛑..बसची विद्युत पोलला धडक,या अपघातात ३ पर्यटक गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,२ मार्च : मालवण येथून गोव्याच्या दिशेने २५ पर्यटकांना घेऊन जाणारी टेंपो ट्रॅव्हलर मिनीबस धामापूर घाडीवाडी येथे निसर्ग हॉटेलच्या समोर दत्ताराम घाडी यांच्या घरासमोरील अंगणात १० फूट खोल खाली कोसळली. या अपघातात ३ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली तर ७ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी कुडाळ येथे रुग्णालयात दाखल केले.
आज बुधवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी गोवा येथून पर्यटकांना मालवण येथे स्कुबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी घेऊन गेलेली टेंपो ट्रॅव्हलर बस पर्यटकांना सायंकाळी परत गोव्याच्या दिशेने घेऊन जाताना ३ :३० वाजता धामापूर येथे आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने सदर २५ प्रवाशांनी भरलेली बस दत्ताराम घाडी यांच्या अंगणात रस्त्यावरून कोसळली. यामध्ये मोरेश्वर आजगावकर यांच्या कुंपण आणि पायऱ्यांचेही नुकसान झाले आहे. बसची धडक एवढी गंभीर होती की यामध्ये रस्ताकडेला असलेला लाइनचा एक विद्युत पोल ट्रॅव्हलरच्या धडकेने मुळापासून पूर्णपणे तुटून ४० फूट लांब गाडीसहीत फरपटत गेला आहे. गेला तर दुसरा ११ केव्ही लाईन पोल वाकून विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्याचप्रमाणे या अपघातात टेंपो ट्रॅवलरचे मोठे नुकसान झाले. यावेळी वीज वितरण कर्मचारी योगेश काळसेकर आणि सागर गावठे यांनी तातडीने घटनास्थळी येत. काही घरांचा वगळता इतर गावातील वीजपुरवठा पूर्ववत केला.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_