आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन

🛑प्रतिदिन प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते ७.७ लाख लिटर सांडपाणी

सुराज्य अभियान उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची कठोर कारवाईची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्ग,२८ : जिल्ह्यातील ३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन : प्रतिदिन प्रक्रीया न करता समुद्रात सोडले जाते ७.७ लाख लिटर सांडपाणी ;
सुराज्य अभियान उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची कठोर कारवाईची मागणीनगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून दर दिवशी एकूण ७.७ दशलक्ष लिटर प्रदूषित सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तसेच समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रीयेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक बाब उघड झाली. प्रदूषित सांडपाणी प्रक्रीया न करता तसेच सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाल्याने हिंदु जनजागृती समितीने याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याविषयी  हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक  श्री. संदेश गावडे यांनी  ओरोस मुख्यालय येथील पत्रकार कक्षात  घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.यावेळी पत्रकार परिषदेला  श्री संजय जोशी रत्नागिरी सुराज्य अभियान समन्वयक आधिवक्ता सौ अस्मिता सोवनी, हिंदु विधिज्ञ परिषद उपस्थित होते.
श्री.गावडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपरिषदांकडून दर दिवशी अनुक्रमे १.५, २.५ आणि २.५ दशलक्ष लिटर सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात आणि नदीत सोडले जाते. कणकवली नगरपंचायतकडून दर दिवशी १.२ दशलक्ष लिटर पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना नोटीसा १४ ऑक्टोबर २०२० या दिनांकाने पाठवल्या होत्या. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि ऑनलाईन सांडपाणी निरीक्षण प्रणाली बसवण्यात याव्यात, असे या नोटीसांमध्ये म्हटले आहे; परंतु यावर पुढे काहीही झालेले नाही. खरे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस पाठवून आपले दायित्त्व झटकत आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाकडून होत असलेली दिरंगाई प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडल्याने समुद्रातील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो. प्रदूषित पाण्याने मासे मृत झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जनता ही मत्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र आणि नदी यांत सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जात असल्याने या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडेच कोरोना, ओमिक्रॉन सारख्या संसर्गजन्य महामारीने आख्खे जग ग्रासलेले असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवाचा धोका वाढवत आहे. या प्रकरणी आम्ही हिंदू विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा सल्ला घेतला. त्यामुळे नगरपरिषदा आणि पालिका यांच्यावरच नव्हे तर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते, असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला.
*नगरपरिषदा, पालिका यांच्या बरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे-आधिवक्ता सौ. अस्मिता सोवनी, हिंदु विधिज्ञ परिषद*
प्रदूषण करणे हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे हे गुन्ह्याला पाठीशी घालणे आहे, , तसेच या प्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीसही दिली आहे. प्रदुषण ही विषारी समस्या असून शहरीकरणाकडे चाललेल्या कोकणामध्ये आताच या समस्येवर कारवाई केली नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रदुषण थांबवण्यासाठी संबंधितांनी त्वरीत कारवाई करावी असे आवाहन  अधिवक्ता सौ.अस्मिता सोवनी यांनी केले तसेच कारवाई न झाल्यास पुढच्या कारवाईचे दरवाजे उघडे आहेत असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!