चौपदरी महामार्गावर मोकाट गुरांची समस्या
🛑चौपदरी महामार्गावर मोकाट गुरांची समस्या
🛑महामार्गच्या दुतर्फा कुंपण घालण्याची गरज
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग ता२१,:- कोकण मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आता चौपदरी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाल्याने वाहतूक आता सुसाट झाली आहे . मात्र या महामार्गाला कुंपण नसल्याने पाळीव जनावरे महामार्गावर येऊन अपघात होत आहेत. त्यामुळे जनावरांबरोबर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे . महामार्गावर येणाऱ्या या मोकाट जनावरांना रोखण्यासाठी हायवे प्राधिकरण व शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा मुक्या जनावरांचा जीव जाण्याबरोबर नागरिकांच्या जीवावर बेतणारे अपघात घडण्याची भीती आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्हात काम जवळपास पूर्ण झाल्याने आता या महामार्गावरील वाहतूक सुसाट झाली आहे . महामार्गावर दुतर्फा कुंपण नसल्याने पाळीव व रानटी जनावरे अचानक महामार्गावर येत असल्याने वाहणांचे अपघात होत आहेत. यामध्ये अनेक जनावरे जायबंदी होतात याचबरोबर वाहनातील प्रवाशांना ही दुखापत होते असे अपघात प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाच्या दुभाजकांत व महामार्गालगत हिरवा चारा व गवत दिसून येत असल्याने जनावरे या ठिकाणी धाव घेतात. ही जनावरे अचानक महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना वाहन नियंत्रित करणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी ही जनावरे दिसूनही येत नसल्याने अपघात घडत आहेत. गेल्या दोन वर्षात अशा अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे यात अनेक वेळा पाळीव जनावरे महामार्गावर काही ठराविक ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे दिसून येते .चौपदरी महामार्ग असल्याने काही वाहनचालक जनावरांना धडक देऊन पसार होतात तर काही वाहन चालक अपघातानंतर भूतदया दाखवत उपचाराचा नुकसानभरपाईचा खर्च करतात .मात्र यामध्ये शेतकरी व वाहनचालकांचे नुकसान होत असून त्याचबरोबर मुक्या जनावरांचे जीव जात आहे. अशा मोकाट गुरांचा महामार्गावरील वावर रोखून जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हावेप्राधिकरण व शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे . अन्यथा मुक्या जनावरांबरोबर माणसे आणि वाहनांचे नुकसान होतच राहणार आहे.
________________________
*🏝️जागा भाड्याने देणे आहे*
*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*
👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला
🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️
*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*