आणखीकणकवलीकरियरकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

कणकवली पत्रकार समितीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर …

🛑…२७ फेब्रुवारीला पिसेकामते येथील मैत्री रिसोर्टमध्ये होणार बक्षिस वितरण

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २६

तालुका पत्रकार समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. रविवार २७ फेब्रुवारी रोजी पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, महाविद्यालयीन अशा तीन गटांमध्ये कणकवली तालुक्यातील शाळांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

निबंध स्पर्धेसाठीचे पाचवी ते सातवी गटासाठी मोबाईलचे फायदे की तोटे आणि बदलते पर्यावरण कारणे व उपाय, हे विषय देण्यात आले होते. यात १. प्रदिप्ती तुळशिदास कुबल (एस. एम. हायस्कूल), २. रिया संजय सावंत (नाटळ हायस्कूल), ३. पुष्पा प्रसाद सावंत (नाटळ हायस्कूल) यांनी यश मिळविले.

आठवी ते दहावी गटासाठी ऑनलाईन शिक्षण फायदे-तोटे आणि कोरोना काय कमावले, काय गमावले, असे विषय देण्यात आले होते. यात १. तनया प्रवीण कदम ( एस. एम. हायस्कूल), २. सोहम नीलेश महेंद्रकर (आयडियल स्कूल, वरवडे), ३. पूजा राजेश आचरेकर ( एस. एम. हायस्कूल) तर उत्तेजनार्थ श्रीराम दीपक सुतार (लोरे हायस्कूल) व नेहा प्रवीण कांबळे (कनेडी हायस्कूल) यांनी यश मिळविले.

महाविद्यालयीन गटासाठी मेक इन इंडिया (बदलता भारत) आणि मैदानी खेळ उपयुक्तता व आरोग्य असे विषय होते. यात १. सिद्धी सुरेंद्र मोरे (टी. एस. सावंत ज्यु. कॉलेज कनेडी, २. तन्वी विजय निरुखेकर (सरस्वती नर्सिंग कॉलेज तोंडवली), ३. श्रद्धा सतीश पाटकर व शांभवी उल्हास कुलकर्णी (दोन्ही कणकवली कॉलेज). उत्तेजनार्थ दर्शना नागेश माईणकर ( एस. एम. ज्यु. कॉलेज) व पल्लवी दीपक सुतार (विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज तळेरे).

तरी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम व पत्रकार आणि मित्रचे संस्थापक अध्यक्ष रजनीश राणे यांनी केले आहे .

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇

*💻जाधव मोबाईल, कणकवली📱*

👉आमच्याकडे *मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह* इ. मध्ये *गाणी 🎶 भरून मिळतील.*

*सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.*

*🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन* इ. सुविधा उपलब्ध.

*🟣आमचा पत्ता🖊️* नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

*🟣संपर्क क्रमांक-*

*📱९४२२५१५७१४*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!