आणखीकणकवलीकरियरकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

कणकवली पत्रकार समितीचा २७ रोजी पुरस्कार वितरण सोहळा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २६

तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे होणार आहे . यावेळी यशस्वी उद्योजक , सामाजिक कायकर्ता , पत्रकार , छायाचित्रकार तसेच निबंध स्पर्धेतील यशस्वीतांचा पारितोषीक वितरण सोहळा व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्रच्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषीक वितरण सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने , उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक , तहसीलदार आर . जे . पवार , पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे , सचिव उमेश तोरस्कर , खजिनदार संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार ज्येष्ठ बांधकाम व्यावसायीक रघुनाथ उर्फ रघु नाईक व विल्बर्ट प्रॉपर्टीजच्या विल्सन पिंटो व दिनेश कुंभार , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार फोंडाघाट हेल्प ॲकॅडमीचे संजय नेरुरकर , बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे , अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर , उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरूप्रसाद सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच तालुका पत्रकार समितीला नेहमीच्च सहकार्य करणारे चंद्रशेखर उपरकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच तालुका पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्र’च्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषीक वितरण सोहळाही होणार आहे.

कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम यांनी केले आहे . या सोहळ्यानंतर पत्रकार व कुटुंबियांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇

*💻जाधव मोबाईल, कणकवली📱*

👉आमच्याकडे *मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह* इ. मध्ये *गाणी 🎶 भरून मिळतील.*

*सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.*

*🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन* इ. सुविधा उपलब्ध.

*🟣आमचा पत्ता🖊️* नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

*🟣संपर्क क्रमांक-*

*📱९४२२५१५७१४*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!