शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा-राजू मुळीक
*🛑शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा-राजू मुळीक*
*🛑शिवजयंती निमित्त कोंडुरा तिठ्यावर रक्तदान शिबिर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा:२२ फेब्रुवारी*
शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा
– राजू मुळीक : शिवजयंती निमित्त कोंडुरा तिठ्यावर रक्तदान शिबिर
बांदा : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अजरामर आहे. गेली चार शतके आपण त्यांचे अनुकरण करतो. सर्व जाती धर्म यांना घेऊन त्यांनी जे कार्य केले त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. या दैवताचा आदर्श घेऊन तरुणांनी पुढे यावे व देशात चांगले विधायक कार्य करून आपण शिवरायांचे मावळे आहोत हे सिद्ध करावे, असे आवाहन मळेवाड जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी येथे केले.
स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली आरोस, कोंडूरा तिठा आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोस दांडेली कोंडुरा तिठा येथे शिवजयंती उत्सव साजरा करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.मुळीक बोलत होते. यावेळी त्यांनी तरुण कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सकाळच्या सत्रात आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. संध्याकाळी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस तसेच पं.स.सदस्य संदीप नेमळेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, दांडेली माजी सरपंच संजू पांगम, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, तानाजी खोत, दिनेश चव्हाण, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव बाबली गवंडे, एकनाथ चव्हाण, श्री.पराडकर,
मंडळाचे शिवम बोंद्रे, अमेय खोत, साहिल खोत, शुभम नार्वेकर, विघ्नेश खोत, समीर खोत, संतोष खोत, शुभम मुळीक, राहुल शिरोडकर, आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी योगेश नाईक, दयानंद गवस, श्री. देसाई सर, संदीप नेमळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तानाजी वरक आणि आभार शिवम बोंद्रे यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

