महिला परिचरांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट
🛑 *महिला परिचर आणि घेतली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट*
🛑 *महिला परिचरांनी केली मानधन वाढ व पदनाम बदलण्याची मागणी*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:15फेबुवारी*
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात कार्यरत महिला परिचरांचे मानधन 10 हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई मंत्रालय येथे झालेल्या बैठकीदरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मानधन वाढीचा निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू केले होते. यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 8 फेब्रुवारीला मंत्रालयात सचिवस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री टोपे होते .या बैठकीत यांनी संघटनेच्या मागणीवर 10 हजाराचे मासिक मानधनाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्याचे आदेश दिले .आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय घेतला जाणार आहे .महिला परिचर पूर्णवेळ काम करतात. मात्र त्यांचे पदमान अंशकालीन परीचर असे आहे. संघटनेने या नावास विरोध असल्याचे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले या संदर्भात उच्च न्यायालयाने संघटनेच्या बाजूने निकाल दिला असून महिला परिचरांना चतुर्थश्रेणीची वेतनश्रेनी व इतर लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु यावर आरोग्य विभागाने सर्वोच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळवला आहे. ही बाब मंत्री महोदय यांच्या लक्षात आणून देण्यात आली. संघटनेच्या मागणीनुसार पदनाम अंशकालीन मध्ये बदल करण्याचे मान्य करण्यात आले . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा केली .तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापर्यंत आदेश जारी करण्यात आला नाही. तर पुढील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी 23 व 24 फेब्रुवारी आयोजित राज्यव्यापी संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर मंगला मेश्राम, सरचिटणीस मंजुळा बांबर भंडारा जिल्हा अध्यक्ष सविता हटवार पालघर जिल्हा अध्यक्ष रेखा पाटील सौ मैना झाटे अकोला जिल्हा सचिव फुलावती ठाकरे आदी उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇
_____________________🎴कोकण लाईव्ह फेसबुक पे👇🏻करा*ttps://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
