कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जनतेच्या पैशाचे विश्वस्त म्हणून पतसंस्था चालवत असताना संचालक मंडळासह सभासदांना प्रशिक्षणाची गरज सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष पणदुरकर यांचे प्रतिपादन

*🛑जनतेच्या पैशाचे विश्वस्त म्हणून पतसंस्था चालवत असताना संचालक मंडळासह सभासदांना प्रशिक्षणाची गरज सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष पणदुरकर यांचे प्रतिपादन*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻ब्यूरो न्युज-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*सावंतवाडी,दि.१६-*
संत रोहिदास या महान संतांची नावे उभारण्यात आलेली संत रोहिदास सहकारी पतसंस्थेतील जनतेचा पैसा विश्वस्त म्हणून जपत असताना घोटाळे होऊ नये यासाठी संचालक मंडळासह सभासदांना प्रशिक्षणाची गरज आहे हे प्रशिक्षण सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून मोफत देण्यात येईल अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष ॲड सुभाष पणदुरकर यांनी केली ते संत रोहिदास यांच्या 645 व्या जयंती उत्सवात बोलत होते सावंतवाडी येथील संत रोहिदास सहकारी पतसंस्थे मध्ये झालेल्या जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी बँकेचे अध्यक्ष तानाजी वाडकर उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण संचालक विजय चव्हाण गणेश म्हापणकर परशुराम चव्हाण विलास जाधव दिगंबर पावसकर भरत लाखे संगीता वाडकर सुलोचना वाडकर तसेच शिवानी पाटकर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ सावंतवाडी शाखा तालुकाध्यक्ष दिलीप इनसुलकर सचिव सदानंद चव्हाण दशरथ वाडकर शेखर मेहतर मानसी कदम श्रावण वाडकर मोहन कांबळे शंकर आसोलकर विराज वाडकर सागर कोठेकर धोंडी इनसुलकर सौ सातार्डेकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ऍड पणदुरकर म्हणाले कलम 97 च्या घटना दुरुस्ती मध्ये आरबीआयच्या नियमांची आणि कायद्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाला तसेच सभासदांना असणे आवश्यक आहे जनतेचा पैसा आहे आणि या पैशाचे आपण विश्वस्त आहोत त्यामुळे पैशाच्या व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळे होऊ नये यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले व हे प्रशिक्षण सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली तसेच ते पुढे म्हणाले ज्यांच्या नावाने पतसंस्था चालते ते संत रोहिदास यांचे कार्यकर्तृत्व महान आहे त्यांच्या नावाप्रमाणेच संस्थेची भरभराट होवो अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या व संत रोहिदासांना विनम्र अभिवादन केले त्यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर यांनी 14 व्या शतकात संत शिरोमणी रोहिदास यांचा तर 16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून हिंदूंचे पतन थांबले अन्यथा हिंदू नामशेष झाले असते
त्यामुळे हे दोन्ही महनीय व्यक्ती पूजनीय आहेत संत रोहिदास यांचा एक जरी दोहा प्रत्यक्षात जीवनात आणला तरी जीवन सुखकर होईल असा विश्वास वाडकर यांनी व्यक्त केला सध्या राष्ट्रीय संतांच्या जयंत्या होत असतात पुतळ्यांचे युग आहे मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडतो अशी खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली या कार्यक्रमास संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक परशुराम चव्हाण यांनी संत रोहिदास यांचा जीवनपट उलगडून दाखवला ते म्हणाले रूढी-परंपरा अत्याचार अनाचार माजलेल्या युगामध्ये संत रोहिदास यांचा जन्म घेतला
त्यामुळे जन्मजात बुद्धिवंत असलेल्या संत रोहिदास यांनी सिकंदर लोधी सारख्या राजाला आपले शिष्य त्व बहाल केले त्यावेळी एकूण 52 राजे-महाराजे त्यांचे अनुयायी झाले त्यामुळे त्यांच्या कार्याची महती दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दोघा ठेवीदारांचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला त्यांनी प्रत्येकी 20000 रुपयांच्या ठेवी पत्र संस्थेकडे आजच्या दिनी दिल्या तर दहा हजार रुपयांची ठेव सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड पण पणदूरकर यांनी जाहीर केली शेवटी कार्यक्रमात आभार प्रदर्शन सचिव सदानंद चव्हाण यांनी केले
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!