विजयदुर्ग किल्ला दुरावस्था प्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवू आमदार वैभव नाईक
*🛑विजयदुर्ग किल्ला दुरावस्था प्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवू आमदार वैभव नाईक*
*🛑हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आमदार नाईक यांची भेट*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी दि-११२ :-*
विजयदुर्ग किल्ला दुरवस्था संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी विविध माध्यमातून समिती आवाज उठवत आहे आपणही याप्रश्नी लक्ष घालून अधिवेशनामध्ये आवाज उठवावा असे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले. आमदार नाईक यांनी आपण निश्चित पणे अधिवेशनामध्ये याप्रश्नी आवाज उठवू, असे आश्वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी समितीचे श्री जयवंत सामंत आणि मिलिंद पारकर उपस्थित होते.
छत्रपती शिवराय आणि मराठा सरदारांच्या पराक्रमाची साक्ष असलेले अनेक किल्ले राज्यात असून त्यांची दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आपला हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा यासाठी हिंदू जनजागृती समितीने राज्यातील गडकोट संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 25 ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यात आले. विविध स्तरातील प्रतिष्ठीत आणि दुर्गप्रेमी यांच्या भेटी घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आला. विजयदुर्ग किल्ल्यावरही परिसरातील ग्रामस्थांनी निदर्शने केली. याविषयी ट्विटरवर ऑनलाइन ट्रेंडही चालविण्यात आला. तालुका पातळीवर तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. त्या प्रश्नी शासनाच्या पातळीवर ठोस निर्णय व्हावा, म्हणून अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे. या अंतर्गत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना भेटून यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

